Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राहा तयार..! आता ‘या’ मोठ्या कंपनीचा आयपीओ येतोय.. पहा, कंपनीने काय केलाय प्लान..?

मुंबई : देशातील शेअर बाजारात पुन्हा एकदा आयपीओसाठी (IPO) अनुकूल वातावरण तयार होताना दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना संकट आणि रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजाराला (Share Market) फटका बसला होता. मात्र, आता शेअर बाजार काही प्रमाणात सावरत आहे. त्यातच आता काही कंपन्यांनी आयपीओ आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांना (Investor) आणखी संधी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. अशीच एक कंपनी रासायनिक निर्माता गुजरात पॉलिसोल केमिकल्स लिमिटेड (GPCL) आहे. GPCL ने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. IPO प्रस्तावाच्या मसुद्यानुसार, GPCL चे या IPO द्वारे 414 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

IPO अंतर्गत, कंपनी 87 कोटी रुपये किमतीचे नवीन समभाग जारी करेल तर प्रवर्तक 327 कोटी रुपये किमतीच्या इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) आणतील. कंपनी IPO मधून उभारलेल्या पैशांचा वापर कर्ज परत करण्यासाठी आणि कॉर्पोरेट सामान्य उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करेल. गुजरात स्थित कंपनी पायाभूत सुविधा-तंत्रज्ञान, रंग आणि रंगद्रव्ये पुरवठादारांपैकी एक आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, मागील वर्ष आयपीओच्या दृष्टीने उत्तम होते. त्यावेळी 65 कंपन्यांनी IPO मधून 1.35 लाख कोटी रुपये उभे केले होते. या वर्षीही अनेक कंपन्या त्यांचे IPO आणत आहेत. गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे. तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कंपन्यांच्या सार्वजनिक ऑफरद्वारे चांगला नफा मिळवू शकता.

Advertisement

देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

IPO Update : आता येणार आणखी दोन कंपन्यांचे आयपीओ; पहा, काय आहे कंपन्यांचे नियोजन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply