Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत ‘आम आदमी’ ला झटका..! पहा, सरकारच्या तिजोरीला कुणामुळे बसलाय फटका; जाणून घ्या..

दिल्ली : कोरोना संकटामुळे सन 2020-21 या आर्थिक वर्षात दिल्लीच्या कर संकलनात 19 टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात सर्व घटकांकडून महसूल वसुलीत मोठी घट झाली आहे. दिल्ली विधानसभेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विधानसभेत आर्थिक आढावा सादर केला. त्यांनी माहिती दिली, की 2019-20 या आर्थिक वर्षात 0.16 टक्क्यांच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात दिल्लीच्या कर संकलनात 19.53 टक्क्यांची घट झाली आहे.

Advertisement

सर्वेक्षणानुसार, या कालावधीत मोटार वाहन करात 13.96 टक्के आणि जीएसटीमध्ये 19.46 टक्के घट झाली आहे. याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्कांतर्गत कर संकलनातही 18.94 टक्के घट झाली आहे. त्याच वेळी, 2020-21 मध्ये तिकीट आणि नोंदणी कर (जमीन महसूलासह) मध्ये 22.91 टक्के घट झाली आहे.

Advertisement

केजरीवाल सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर संकलनात 46.13 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात दिल्ली सरकारचे एकूण महसूल संकलन 41,863.60 कोटी रुपये (जीएसडीपीच्या 5.33 टक्के) झाले आहे. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ते 47,135.81 कोटी रुपये (जीएसडीपीच्या 5.94 टक्के) होते.

Advertisement

याशिवाय, अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात दिल्लीतील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट आहे. त्यात असे नमूद केले आहे की, दिल्लीचा GSDP वार्षिक 17.65 टक्क्यांनी वाढून 2021-22 या आर्थिक वर्षात 9,23,967 कोटी रुपये झाला आहे. त्यानुसार दिल्लीने 2021-22 मध्ये 1,450 कोटी रुपयांचा महसूल अधिशेष नोंदला आहे. दिल्लीची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट करताना लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी बुधवारी विधानसभेत आपल्या भाषणा दरम्यान सांगितले होते की, 2016-17 नंतरच्या 5 वर्षांत दिल्लीचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 50 टक्क्यांनी वाढले आहे.

Loading...
Advertisement

लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, की कोविडमुळे 2020-21 मध्ये दिल्लीच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. बैजल यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की 2021-22 मध्ये दिल्लीचा जीडीपी 9,23,967 कोटी रुपये होता आणि तो 2016-17 च्या 6,16,085 कोटी रुपयांच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढला आहे. हे दिल्लीची मजबूत आर्थिक स्थिती दर्शवते. ते म्हणाले, की 2021-22 मध्ये दिल्लीचे दरडोई उत्पन्न 4,01,922 रुपये होते जे देशाच्या सरासरीपेक्षा तिप्पट आहे.

Advertisement

दिल्लीत उन्हामुळे हाहाकार..! तापमानाबाबत हवामान विभागाने दिलाय ‘हा’ इशारा; जाणून घ्या..

Advertisement

धक्कादायक..! जगातील 50 पैकी 35 प्रदूषित शहरे भारतात; दिल्लीनेही केलेय ‘हे’ मोठे रेकॉर्ड; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply