Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेचा इतका धसका की, चीनचे परराष्ट्र मंत्री थेट नेपाळमध्ये.. पहा, कशामुळे वाढलेय चीनचे टेन्शन..!

दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आता नेपाळमध्ये (Nepal) पोहोचले आहेत. याआधी ते भारतात आले होते. त्यानंतर आता नेपाळमध्ये पोहोचले आहेत. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी शुक्रवारी दुपारी तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी काठमांडूला पोहोचले.

Advertisement

भारत भेटीनंतर वांग नेपाळमध्ये पोहोचले. पाकिस्तान, अफगाणिस्तान नंतर भारत आणि आता नेपाळ असा त्यांचा दौरा आहे. नेपाळ दौऱ्याचे कारणही तसेच खास आहे. यासाठी अमेरिका (America) कारणीभूत ठरला आहे. होय, खरे तर मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन (MCC) कराराला नेपाळने मान्यता दिली आहे. या करारांतर्गत अमेरिकेकडून नेपाळला 500 दशलक्ष डॉलर अनुदान (Subsidy) मिळणार आहे. नेपाळमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनसाठी हा एक धक्का मानला जात आहे.

Advertisement

एका मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या एका पुनरावलोकनात नेपाळमधील चीनचा प्रभाव कमकुवत होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ज्या अंतर्गत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सध्याची परिस्थिती बदलण्याचे मार्ग शोधण्यासाठी नेपाळला पाठवले आहे. काठमांडूमधील वांग यांचा मुख्य अजेंडा चीनच्या भू-राजकीय आणि सुरक्षा आव्हानांचे पुनर्मूल्यांकन करणे हा असल्याचेही वृत्त आहे. येथील राजकीय वातावरणाचाही ते आढावा घेणार आहेत.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, नेपाळमध्ये बीआरआय प्रकल्पांची अंमलबजावणी चीनसाठी (China) महत्त्वाची आहे. पण आता चीनला या कॉम्पॅक्ट मंजुरीमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या आव्हानांची चिंता आहे. काठमांडूमधील एका चिनी अधिकाऱ्याने सांगितले की, नेपाळ संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या चिनी एजन्सींमध्ये समन्वयाचा अभाव आहे. चीन आणि चिनी दूतावासातील अंतर वाढत असल्याचेही ते म्हणाले. नेपाळच्या संसदेने अमेरिकेच्या इराद्यानेच या कराराला मंजुरी दिली आहे. या करारामुळे चीनचे टेन्शन वाढले आहे आणि त्याला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. चीनला घेरण्यासाठी अमेरिका नेपाळमध्ये 500 दशलक्ष डॉलर्सची धोरणात्मक गुंतवणूक करत आहे.

Advertisement

रशियाला आणखी एक झटका देण्याची तयारी.. अमेरिका-युरोपने केलाय ‘हा’ मोठा करार..

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढले चीनचे टेन्शन.. रशियामुळे चीनचे असे होतेय नुकसान; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply