Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलांचे टेन्शन घेऊ नका..! वाढत्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने केलाय ‘हा’ बंदोबस्त..

मुंबई : रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि जागतिक बाजारातील बदलत्या ट्रेंडमुळे खाद्य तेलाचा आंतरराष्ट्रीय पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या (Edible Oil) दरात वाढ झाली आहे. या परिस्थितीची थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसू लागला असून त्यामुळे महागाई वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी तातडीने उपाय म्हणून सरकारने मोहरीच्या तेलाच्या वायदे व्यवहारावर बंदी घातली आहे. याबरोबरच मोहरीवरही साठा मर्यादा टाकण्यात आली आहे. सीमा शुल्कातील सवलतीचे दर आता या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील. केंद्र सरकारने आयात (Import) अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर दीर्घकालीन पावले देखील उचलली आहेत. देशांतर्गत पुरवठा सुधारण्यासाठी आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सरकारने याआधीच सुधारणा करून सीमाशुल्क दर सर्वात कमी पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

सरकारने आधीच क्रूड पाम तेल (Palm Oil), क्रूड सोयाबीन तेल, क्रूड सनफ्लॉवर तेल शुल्क मुक्त केले होते, जे आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ केले आहे. रिफाइंड पाम तेलावरील अतिरिक्त सीमा शुल्क डिसेंबर 2022 पर्यंत हटवण्यात आले आहे. खाद्य तेलाच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहरी तेलाचा वायदा व्यवहार बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर मोहरी आणि मोहरीच्या तेलावरही साठा मर्यादा टाकण्यात आली आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 125 रुपये प्रतिलिटर असलेले खाद्यतेल 170 ते 180 रुपये किलोने विकले जात असल्याची परिस्थिती आहे. मे आणि जूनमध्ये या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असे खाद्यतेल उद्योग संघटनांचे मत आहे.

Advertisement

दक्षिण अमेरिकेत दुष्काळामुळे सोयाबीनची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाचा पुरवठा बंद झाल्याचा परिणाम इतर तेलांवर दिसून येत आहे. इंडोनेशियाच्या नवीन तेल धोरणामुळे पाम तेलाच्या किमतीत तेजीचा कल आहे. जागतिक बाजारपेठेतील ही प्रतिकूल परिस्थिती पाहता सरकारने योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खरे तर रशियापेक्षा कितीतरी जास्त खाद्यतेल युक्रेनमधून आयात केले जाते. 2020-21 या आर्थिक वर्षात एकट्या युक्रेनमधून 17.44 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले आहे, तर रशियामधून केवळ 3.48 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले आहे.

Loading...
Advertisement

ओपन जनरल लायसन्स (OGL) अंतर्गत या देशांमधून तेल आयात केले जाते. नोव्हेंबर, 2021-फेब्रुवारी, 2022 या कालावधीत युक्रेनमधून एकूण 8.43 लाख टन सूर्यफूल तेल आयात करण्यात आले. हे एकूण आयात केलेल्या सूर्यफूल तेलाच्या 85 टक्के आहे, तर 14.3 टक्के रशियामधून येते. खाद्यतेलाच्या देशांतर्गत वापराच्या 60 टक्के आयात केले जाते.

Advertisement

खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढले, किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने ‘हा’ निर्णय घेतलाय..

Advertisement

युद्धाचा इफेक्ट..! खाद्यतेलामुळे बिघडले खर्चाचे गणित; पहा, पंधरा दिवसात किती वाढलेत भाव..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply