Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाला आणखी एक झटका देण्याची तयारी.. अमेरिका-युरोपने केलाय ‘हा’ मोठा करार..

दिल्ली : युक्रेन विरोधात युद्ध सुरू केल्यापासून रशिया जगात एकटा पडत चालला आहे. रशियावर कठोर निर्बंध टाकून त्याला एकटे पाडण्यात अमेरिका आणि युरोपातील देश आघाडीवर आहेत. आताही अमेरिका आणि युरोपिय देशांनी असा एक निर्णय घेतला आहे ज्याचा फटका रशियाला बसणार आहे. रशिया युरोपला नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल पुरवठा करणारा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. त्यामुळे रशियन ऊर्जेवरील युरोपिय देशांचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) ने लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) संदर्भात मोठ्या कराराची घोषणा केली आहे. बीबीसीने नुकत्याच दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान शुक्रवारी या कराराची घोषणा करण्यात आली. करारानुसार, अमेरिका वर्षाच्या अखेरीस युरोपिय संघाला किमान 15 अब्ज अतिरिक्त घनमीटर एलएनजी प्रदान करेल. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून रशियन वायूचा वापर कमी करणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. याचा अर्थ असा होईल, की आयात वाढ करणे आणि अधिक अक्षय ऊर्जा निर्माण करणे याला सर्वोधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

Advertisement

रशिया हा युरोपातील ऊर्जेचा प्रमुख पुरवठादार देश आहे आणि युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे ऊर्जेसंबंधित संसाधनांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. कोविड संकटातून अर्थव्यवस्था हळूहळू सावरत असल्याने या युद्धाआधीच ऊर्जेच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, असे बीबीसीने म्हटले आहे. युक्रेनमधील आक्रमणामुळे युरोपियन युनियनने या वर्षी इतर देशांकडून आयात वाढ करुन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देऊन रशियन गॅसचा वापर दोन तृतीयांश कमी करण्याचे वचन दिले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंजूर केला आहे. या ठरावात तात्काळ युद्धविराम आणि लाखो नागरिकांसह घरे, शाळा आणि रुग्णालये यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. ठराव रशियाच्या आक्रमकतेच्या “गंभीर मानवतावादी परिणामांचा” निषेध करतो. या ठरावात म्हटले आहे की, गेल्या अनेक दशकांत जगाने युरोपमध्ये इतके मोठे मानवतावादी संकट पाहिले नाही.

Advertisement

युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. युक्रेनचा प्रस्ताव रशियाच्या हमल्यामुळे निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाबाबत होता. या प्रस्तावाच्या बाजूने 140 तर विरोधात 5 मते पडली. त्याचवेळी भारतासह 38 सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव महासभेने मंजूर केला आणि तात्काळ युद्धबंदीची मागणी केली.

Advertisement

ज्याचा अंदाज होता ते घडलेच..! अमेरिकेच्या इशाऱ्यावर रशियाचा आणखी एक रस्ता बंद; पहा, कोणते नवे निर्बंध टाकले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply