मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याच वेळी, डिझेलचे दर प्रति लिटर 89.07 रुपये झाले आहेत. एक दिवस आधी, गुरुवारी, 24 मार्च 2022 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 97.01 रुपये प्रति लिटर होती. तर एक लिटर डिझेलची किंमत 88.27 रुपये होती. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, इराण लवकरच कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू करणार असल्याच्या बातम्या आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या किमती 2 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $118 च्या खाली आले आहेत. किमती घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे युरोपिय देशांत रशियाकडून होणारा क्रूड तेलाचा पुरवठा न थांबवण्याचा निर्णय. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रूड तेलाच्या किमतीत कमालीची अस्थिरता असेल. कारण रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरूच आहे. मात्र, येत्या काही दिवसांत इराणमधून पुरवठा सुरू झाल्यास तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कच्च्या तेलाची किंमत. मात्र, सरकार पेट्रोल आणि डिझेलवर भरमसाठ कर आकारते. 100 रुपयांचे पेट्रोल मिळाले तर त्यातील 52 रुपये कराच्या रूपात सरकारच्या खिशात जातात. अशा परिस्थितीत सरकारला हवे असल्यास करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, तसे होताना दिसत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारुन जबरदस्त कमाई केली आहे. गेल्या 3 वर्षात दरडोई वार्षिक उत्पन्न 1.26 लाख रुपयांवरून 99,155 रुपये प्रति वर्षावर आले असताना, उत्पादन शुल्कातून सरकारचे उत्पन्न 2,10,282 कोटी रुपयांवरून 3,71,908 कोटी रुपये इतके वाढले आहे. मागील तीन वर्षात पेट्रोल डिझेलवर कर आकारुन सरकारने 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
Petrol-Diesel Price : आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ.. जाणून घ्या मुंबईत किती झाले दर