Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शहरात कशाला, अगदी गावातही सुरू करू शकता ‘हा’ खास बिजनेस; सरकारही करेल की मदत; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

मुंबई : रोजगाराच्या शोधात अनेक जण गाव सोडून शहरात स्थलांतरित होतात. जेणेकरून त्यांना चांगला रोजगार मिळेल. पण आज आम्ही तुम्हाला या अशाच एका बिजनेसबद्दल (Business) सांगणार आहोत, जो तुम्ही गावात राहून कमी खर्चात सहज सुरू करू शकता. पिठाच्या गिरणीचा (Flour Mill) व्यवसाय हा एक छोटा व्यवसाय आहे. ज्यामध्ये गहू आणि इतर गोष्टी दळण्याचे काम केले जाते. पिठाच्या गिरणीचा व्यवसाय गावात वेगाने वाढत चालला आहे. हा बिजनेस सुरू करण्यासाठी सरकार (Government) आर्थिक मदतही करते. यासाठी सरकारने अनेक योजनाही आखल्या आहेत. ज्याद्वारे तुम्ही हा बिजनेस सहज सुरू करून स्वत:चा रोजगार सुरू करू शकता.

Advertisement

हा बिजनेस सुरू करण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही हा बिजनेस आठवडे बाजाराच्या ठिकाणीही सुरू करू शकता. तसेच ज्या गावात शेती जास्त आहे अशा ठिकाणीही गिरणी टाकू शकता. जर तुम्ही पिठाच्या गिरणीचा व्यवसाय मर्यादीत स्वरुपात सुरू करत असाल तर अगदी कुठेही सुरू करू शकता. जर तुम्ही हा बिजनेस मोठ्या प्रमाणावर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला परवाना (Licence) आणि नोंदणी (Registration) करावी लागेल. जे तुमच्या जवळच्या अन्न विभागात सहज बनवले जाईल. याशिवाय तुम्हाला महापालिका, नगरपालिका इत्यादींकडून व्यापार परवानाही मिळू शकतो.

Loading...
Advertisement

हा बाजारपेठेत अतिशय वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. पिठाच्या गिरणीच्या व्यवसायात तुम्हाला मशिन आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी सुरुवातीला सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च करावे लागतील. एकदा बिजनेस सुरू झाला की तुम्ही महिन्याभरात अगदी सहज चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

Business Idea : गावात सुरू करता येतील ‘हे’ बिजनेस; कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त उत्पन्नाची हमी; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply