Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोन्याच्या दरात मोठी वाढ..! जाणून घ्या, राज्यातील मोठ्या शहरांतील सोन्या-चांदीचे भाव..

मुंबई : सध्या सोन्या आणि चांदीचे भाव (Gold Silver Price) सातत्याने कमी जास्त होत आहेत. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, आज बाजार सुरू होताच सोन्याचे दर 47 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचले. गुरुवारी बाजार 47 हजार 350 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजे, आज सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव 68 हजार 500 रुपये प्रति किलो इतका आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागरिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांआधी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर सहाशे रुपयांनी वाढले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 47950 इतके आहे. तर चांदीचा (silver)दर 68500 प्रति किलो इतका आहे.

Advertisement

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 950 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52 हजार 310 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48 हजार 050 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52 हजार 350 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48 हजार 020 आणि 52 हजार 330 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 68500 रुपये इतका आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती बेसुमार वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमती वाढल्या म्हणून वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईतही वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक वाढल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

पहिल्याच दिवशी खुशखबर..! आजही सोने-चांदी स्वस्त; खरेदीआधी जाणून घ्या किती रुपयांनी दर घटले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply