Take a fresh look at your lifestyle.

आमदारांना झटका..! पेन्शनबाबत ‘या’ राज्याने घेतलाय महत्वाचा निर्णय; पहा, आता कशा पद्धतीने मिळणार पेन्शन..

दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे की अनेक वेळा निवडणूक जिंकलेल्या आमदार आणि माजी आमदारांना प्रत्येक टर्मसाठी पेन्शन मिळणार नाही. फक्त एक टर्म पेन्शन दिली जाईल. त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणारी पेन्शनही कपात करण्यात येणार आहे. मान म्हणाले, की ‘आता पंजाबची तिजोरी नेत्यांसाठी नव्हे तर जनतेसाठी वापरली जाईल.’ याबरोबरच भगवंत मान यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला.

Advertisement

सीएम मान म्हणाले, की बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. युवक डिग्री घेऊन घरी परतले. पदवी घेऊन जाब विचारायला गेल्यावर लाठीचार्ज होतो. रोजगार उपलब्ध नाहीत. या प्रकरणी आम्ही खूप मोठे निर्णय घेत आहोत. ते पुढे म्हणाले, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अनेक आमदार ज्यापैकी काही तीनदा जिंकले, हरले, चार वेळा जिंकले, तिकीट मिळाले नाही, पाच वेळा जिंकले, सहा वेळा जिंकले, विधानसभेत आले नाहीत. त्यांना लाखो रुपये पेन्शन मिळते. तेही दर महिन्याला. कोणी 3.50 लाख तर कोणी 4.50 लाख. कुणाला तर साडे पाच लाखही मिळतात. त्यामुळे तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भार आहे. याआधी येथे आमदार असलेल्या खासदारांचे पेन्शनही अनेक जण घेत आहेत.

Advertisement

त्यामुळे आज मी पंजाब सरकारच्या वतीने मोठा निर्णय घेणार आहे. आमदाराला दोनदा, पाच वेळा, सात वेळा निवडणुकीत जिंकला, पण पेन्शन फक्त एकाच टर्मसाठी मिळेल. तो किती वेळा जिंकतो हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे पेन्शनवर खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तो पैसा जनतेच्या भल्यासाठी खर्च केला जाईल. कारण सेवा करण्यासाठी कोणालाही इतके पेन्शन देणे समर्थनीय नाही. त्याच प्रमाणे त्यांचे कौटुंबिक पेन्शनही खूप जास्त आहे. तेही कपात करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.

Advertisement

पहिलाच निर्णय रोजगाराचा..! ‘या’ राज्यात महिनाभरात 25 हजार पदे भरणार.. पहा, कुणी केलीय घोषणा..

Advertisement

मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आणखी एक निर्णय; तब्बल 35 हजार कर्मचाऱ्यांचा होणार फायदा; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply