Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त 1200 रुपयांत तब्बल 968 किलोमीटर.. ‘ही’ आहे जबरदस्त मायलेज देणारी मोटारसायकल; चेक करा, डिटेल..

पुणे : सध्या देशात इंधनाचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोक आता जास्त मायलेज (Mileage) देणाऱ्या वाहनांच्या शोधात आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांनाही (Electric Vehicle) मागणी वाढत आहे. बजाज कंपनीच्या काही दुचाकी मायलेजच्या बाबतीत अन्य दुचाकींच्या तुलनेत आघाडीवर आहेत. या मोटरसायकलचे मायलेज इतके जबरदस्त आहे की ते दिल्ली ते लडाख इतके लांबचे अंतर केवळ 1200 रुपयांमध्ये पार करू शकते. अनेक रिपोर्ट्सनुसार, इंधनाच्या किंमती आणखी वाढणार आहेत. अशा परिस्थितीत, लोक 115cc इंजिनपर्यंत मोटरसायकल घेणे पसंत करत आहेत, ज्यांचे मायलेज खूप चांगले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मायलेजच्या बाबतीत जबरदस्त असणाऱ्या एका मोटारसायकलची माहिती देणार आहोत.

Advertisement

Bajaj Platina 110

Advertisement

बजाज ऑटोची (Bajaj Auto) ही दुचाकी बजाजच्या सर्वात स्वस्त मोटरसायकलींपैकी एक आहे आणि ती शक्तिशाली देखील आहे. यात 115 सीसी इंजिन आहे. हे 7000 rpm वर 6.3 kV चा पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या दुचाकीची किंमत 68,384 (एक्स-शोरूम दिल्ली) रुपयांपासून सुरू होते. ही मोटरसायकल 84 kmpl पर्यंत मायलेज देते. आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. बजाज प्लॅटिना (Bajaj Platina) 110 ची 11 लिटर इंधन टाकी क्षमता, पेट्रोलची किंमत आणि मायलेज यावर आधारीत, 1200 रुपयांच्या पेट्रोलमध्ये ही मोटारसायकल जवळपास 968.3 किलोमीटरचे अंतर पार करू शकते.

Loading...
Advertisement

या विभागातील ही पहिली मोटरसायकल आहे जी ABS वैशिष्ट्याने सुसज्ज आहे. यामध्ये 20 टक्के जास्त सस्पेन्शन दिले आहे, त्यामुळे खड्डे आणि खराब रस्त्यांवर जास्त त्रास जाणवत नाही. याशिवाय, इंटिग्रेटेड डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, एबीएस-इंडिकेट अॅनालॉग स्पीडोमीटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आरामदायी प्रवासासाठी यात स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेंशन आहे. यात ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. याशिवाय एलईडी डीआरएल हेडलॅम्प आणि रुंद रबर फूटपॅड्स चांगल्या पकडीसाठी देण्यात आले आहेत. ही मोटारसायकल तीन रंगात उपलब्ध आहे.

Advertisement

वाव.. Honda Activa ला टक्कर देतेय ‘ही’ दमदार स्कूटर; मायलेज जबरदस्त, किंमत आहे बजेटमध्ये..

Advertisement
Advertisement

Leave a Reply