Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारत ‘या’ देशाला पुन्हा देणार 40 हजार टन डिझेल; पहा, कोणता देश सापडलाय मोठ्या संकटात..

मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला (Sri Lanka) केंद्र सरकारने तातडीने डिझेल (Diesel) देण्याची घोषणा केली आहे. सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लवकरच 40,000 टन डिझेलची खेप देणार आहे. हे डिझेल श्रीलंकेला पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या सात मासिक शिपमेंट (Shipment) व्यतिरिक्त असेल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत अचानक डिझेलचा मोठा दुष्काळ निर्माण झाला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली होती. इंधनाच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यातही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

तेल मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) या प्रकरणी पाठवलेल्या ई मेलला प्रतिसाद दिला नाही. वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतरच्या जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुविधांच्या उपलब्धतेसारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि उद्योग एकमेकांबरोबर समन्वय साधत आहेत. भारतीय बँक आणि श्रीलंका सरकारने 2 फेब्रुवारी रोजी भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीसाठी 50 कोटी डॉलर क्रेडिट लाइनच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

Advertisement

केंद्र सरकारचा नवा निर्णयही महत्त्वाचा आहे कारण युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचा पुरवठा आणि किमतीत अडचणी येत आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही विक्रमी वाढल्या आहेत. देशातही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढत आहेत. तसेच भारताने आता रशियाकडूनही कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तत्काळ डिझेल पुरवठा करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. भारताने याआधीही श्रीलंकेला इंधन पुरवठा केला आहे.

Advertisement

दरम्यान, श्रीलंकेत सध्या तांदूळ (Rice) आणि साखर (Sugar) 290 रुपये किलोने विकली जात आहे. 400 ग्रॅम दूध पावडरची (Milk Powder) किंमत 790 रुपये आहे. गेल्या तीन दिवसांत दूध पावडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. श्रीलंका सरकारने पेपर्सच्या कमतरतेमुळे शालेय परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, अशा अनेक अडचणी या देशात निर्माण झाल्या आहेत.

Loading...
Advertisement

चीनचे (China) श्रीलंकेवर 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज (Loan) आहे. गेल्या वर्षी, देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चीनकडून आणखी 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. पुढील 12 महिन्यांत श्रीलंकेला देशी आणि विदेशी कर्ज परत करण्यासाठी सुमारे $7.3 अब्ज डॉलरची गरज आहे. नोव्हेंबरपर्यंत, देशातील परकीय चलनाचा साठा केवळ $1.6 अब्ज होता.

Advertisement

बाब्बो.. ‘तिथे’ साखर मिळतेय 290 रुपये किलो.. पहा, चीनच्या कर्जात कसा फसलाय ‘हा’ देश..

Advertisement

कर्जाने बेहाल.. महागाईने केले हैराण; आता लोकही सरकारवर भडकले; पहा, काय सुरू आहे ‘या’ देशात..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply