Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेबाबत केंद्र सरकारने दिलीय महत्वाची माहिती; पहा, रेल्वे मंत्र्यांनी नेमके काय म्हटलेय..?

मुंबई : देशातील रेल्वेबाबत (Railway) केंद्र सरकारने आज महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, रेल्वेचे खाजगीकरण (Privatisation) करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. संसदेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्यांनी बुधवारी म्हटले होते, की केंद्र सरकारने रेल्वेच्या खाजगीकरणाचा विचार सोडावा, त्यानंतर आज रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले, की रेल्वेचे खासगीकरण होणार नाही.

Advertisement

ते म्हणाले की, दरवर्षी कोट्यावधी लोक रेल्वेद्वारे प्रवास करतात. त्याचबरोबर 1000 कोटी लोकांना प्रवास करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देताना वैष्णव यांनी सर्व राज्यांना रेल्वेच्या चांगल्या कामकाजासाठी केंद्राबरोबर काम करण्यास सांगितले. काँग्रेस नेते खडगे म्हणाले की, रेल्वेत सुमारे 2.65 लाख पदे रिक्त आहेत. 3.18 लाख लोक रोजंदारीवर काम करत आहेत आणि 9.67 लाख पदे नियमित आहेत.

Advertisement

जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशन्सबाबत (Railway Station) माहिती देताना वैष्णव म्हणाले की, केंद्र सरकार ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’ यानुसार कार्यवाही करत आहे आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रत्येक विभागामध्ये एका स्टेशनवर कामकाज सुरू झाले आहे. वैष्णव म्हणाले, की ‘आम्ही 2019 मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन सुरू केली. अशा जागतिक दर्जाच्या रेल्वे आणण्यासाठी साधारण चार ते सात वर्षांचा वेळ द्यावा लागतो, परंतु आम्ही दोन वर्षांत या रेल्वे आणल्या railways-won-t-be-privatised-says-railways-minister-ashwini-vaishnawआहेत.

Advertisement

दरम्यान, रेल्वेने रेल्वे स्टेशनवर (Railway Station) मोफत वाय-फाय सुविधा (Free Wi Fi Service) देण्यास सुरुवात केली आहे.भारतीय रेल्वे देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधा देत आहे.

Advertisement

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदात्यांपैकी एक असलेल्या RailTel ने म्हटले आहे की, मोफत हाय-स्पीड वाय-फाय इंटरनेट सुविधा आता देशभरातील 6100 रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील उबरनी रेल्वे स्टेशनमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केल्यामुळे, वाय-फाय कव्हरेजसह 6100 रल्वे स्टेशनची संख्या पूर्ण केली आहे. या 6100 रेल्वे स्टेशनपैकी 5000 हून अधिक स्टेशन्स ग्रामीण भागात आहेत. जी ईशान्य विभागातील अनेक स्टेशन्स आणि काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील सर्व 15 स्टेशन्सप्रमाणे देशभरातील अनेक दुर्गम स्टेशनवर वाय-फाय सुविधा प्रदान करतात.

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! तब्बल ‘इतक्या’ रेल्वे स्टेशनवर मिळतेय मोफत वाय-फाय; पहा, कसा होणार फायदा..

Advertisement

कोणी रेल्वे घेता रेल्वे..! मोदी सरकारला मिळेना रेल्वेसाठी गुंतवणूदार.. कशामुळे आलीय ही वेळ पाहा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply