Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाकडून किती मिळतेय कच्चे तेल ? ; केंद्र सरकारने दिलेय ‘या’ प्रश्नाचे उत्तर; वाचा, महत्वाची माहिती..

दिल्ली : युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियावर अनेक कठोर आर्थिक निर्बंध टाकले गेले आहे. या निर्बंधांनी अक्षरशः हैराण झाला आहे. या काळात रशियाने भारताला कच्चे तेल पुरवठा करण्याची ऑफर दिली होती. कच्चे तेल कमी दरात मिळत असल्याने भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू केले आहे. त्यानंतर आता भारत रशियाकडून नेमके किती तेल आयात करत आहे, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले आहे.

Advertisement

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, रशियाकडून भारताने आयात केलेले क्रूड तेलाचे प्रमाण खूप कमी आहे आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात सरकार पेमेंटसह व्यापाराशी संबंधित विविध घटकांवर लक्ष देत आहे. प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, रशियाबरोबरच्या व्यापारात उद्भवणाऱ्या समस्येमुळे सरकार पेमेंटसह विविध मुद्द्यांवर लक्ष देत आहे.

Advertisement

ते म्हणाले, की यासाठी अर्थ मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्रालयांचा एक गट आहे. रशियाबरोबरच्या तेल व्यापाराबाबत ते म्हणाले, “आम्ही रशियाकडून फारच कमी (क्रूड) तेल आयात करतो. ते देशाच्या आयातीच्या एक टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. अनेक देश आपल्यापेक्षा 20 पट अधिक तेल रशियाकडून आयात करतात.” रशिया-युक्रेन संघर्षानंतर आपल्या शेजारी देशात अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत.”

Advertisement

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील युद्ध थांबवले नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात, ज्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. खरं तर, रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. रशिया युरोपला (Europe) 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करतो. भारत रशियाकडून कच्चे तेलही खरेदी करतो. जगात पुरवल्या जाणाऱ्या 10 बॅरल तेलामध्ये एक डॉलर रशियाकडून येतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने किमती आणखी वाढू शकतात.

Loading...
Advertisement

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती दोन कारणांमुळे वाढल्या आहेत. पहिले कारण रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरे कारण म्हणजे चीनमध्ये (China) कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे. रशिया आणि युक्रेनचे अधिकारी एकमेकांना भेटत आहेत, तरीदेखील बैठकांमध्ये काहीच निर्णय होत नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.

Advertisement

युद्धाच्या संकटात कच्च्या तेलाचे काय..? ; सरकारने सांगितलेय रशियाच्या तेलाचे गणित; पहा, आपल्याला किती मिळतेय तेल..

Advertisement

चीनने ऐनवेळी दिला मदतीस नकार; रशियाला आता भारताचाच आधार; पहा, आता भारत काय करणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply