Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून देशात वाढताहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती.. पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलेय ‘हे’ कारण; जाणून घ्या..

दिल्ली : विधानसभा निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) पुन्हा वाढत आहेत. मागील दोन दिवसात किंमतीत 1.60 रुपये वाढ झाली आहे. आधीच तेलाच्या किंमती जास्त होत्या त्यात आता ही दरवाढ नागरिकांना चांगलीच मनस्ताप देणारी ठरत आहे. सध्याची परिस्थिती पाहता दर आणखी वाढणार असल्याचेच सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी कमी होणार नाहीत, असेच दिसत आहे. सरकारी पातळीवरही या मुद्द्यावर फार काही होत नाही. देशात अशी परिस्थिती असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी देशातील इंधनाच्या दरवाढीच्या मुद्द्यावर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळेच देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, देशातील जनतेला किफायतशीर दरात इंधन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Advertisement

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीच्या किमती 37 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. ते म्हणाले की, कोविड-19 संकटानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) निर्माण झालेल्या परिस्थितीचा इंधनाच्या किमतींवर परिणाम दिसून येत आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2022 पर्यंत 285 टक्के वाढ झाली आहे. ते म्हणाले की, मला ही तथ्ये सभागृहात सांगायची आहेत जेणेकरून सर्व सदस्यांना समजेल की आज आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय आहे. अशा परिस्थितीतही देशातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत इंधन (Fuel) मिळावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Loading...
Advertisement

दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, की देशभरात प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अंतर्गत 1.15 कोटींहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण मंजूर घरांपैकी 56.20 लाख युनिट्स आधीच पूर्ण झाली आहेत किंवा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहेत, तर 94.79 लाख बांधकाम चालू आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंजूर घरांचे बांधकाम (Construction) वेगाने करण्याची सूचना देण्यात आली आहे जेणेकरून कार्यवाही मुदतीत होईल.

Advertisement

युद्धाचा ‘असा’ ही इफेक्ट..! शेजारी देशांमध्येही वाढलेत पेट्रोलचे भाव; पहा, ‘तिथे’ किती रुपयांना मिळतेय पेट्रोल..

Advertisement

अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलनंतर ‘या’ इंधनानेही दिलाय झटका.. पहा, मोठ्या शहरांत किती वाढलेत भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply