Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्यामुळे’ तेल कंपन्यांना बसलाय 19 हजार कोटींचा फटका.. पहा, कसे बिघडलेय तेलाचे गणित..

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या म्हणून तेल कंपन्यांना चांगलाच फटका बसला आहे. मूडीज इन्व्हेस्टर संस्थेचा अंदाज आहे, की कच्च्या तेलाचे भाव वेगाने वाढत असताना किरकोळ किंमतींमध्ये वाढ न झाल्यामुळे, IOC, BPCL आणि HPCL यांना मार्चमध्येच $2.25 अब्ज म्हणजेच तब्बल 19 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

Advertisement

4 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 पर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. त्याच वेळी, मार्चच्या पहिल्या तीन आठवड्यात, सरासरी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $ 111 पर्यंत वाढल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये क्रूड तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $82 च्या पातळीवर होती. अलीकडेच तेल कंपन्यांनी दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1.6 रुपयांनी वाढ केली आहे.

Advertisement

या अहवालात म्हटले आहे की, सध्याच्या बाजार भावानुसार तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति बॅरल $25 आणि डिझेलवर प्रति बॅरल $24 इतके नुकसान सहन करावे लागत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती सध्याच्या सरासरी $111 प्रति बॅरलच्या जवळपास राहिल्यास आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल न झाल्यास IOC, BPCL आणि HPCL या तीन तेल कंपन्यांना दररोज $6.5 ते 7 कोटींचा तोटा सहन करावा लागेल. अंदाजानुसार, तेल कंपन्यांना मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून आतापर्यंत $ 2.25 अब्जचे नुकसान झाले आहे.

Advertisement

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून IOC चा महसूल $1 ते 1.1 अब्ज इतका असण्याचा अंदाज आहे, तर BPCL आणि HPCL या दोन्ही कंपन्यांना 55 ते 65 कोटी डॉलर इतके नुकसान होईल, असा अंदाज आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती त्यांच्या पातळीवर राहिल्या तर तेल कंपन्या काही प्रमाणात नुकसान भरून काढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Loading...
Advertisement

कच्च्या तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत. सध्या, ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल $ 120 च्या पातळीच्या वर आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीस, किंमत प्रति बॅरल $ 139 वर पोहोचली होती. नंतर किंमती प्रति बॅरल $ 100 पर्यंत खाली आल्या. कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सध्या रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसत असून, रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. सध्या रशियाने भारताला कमी किंमतीत कच्चे तेल देऊ केले असून तेल कंपन्यांनीही तेल खरेदी केले आहे. इराणकडून पुरवठा वाढण्याच्या संकेतांवरच सध्या तेलाच्या किमती कमी होत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement

युद्ध तर होतेच, आता चीनचा कोरोनाही आलाय..! पहा, जागतिक बाजारात कच्च्या तेलाला ‘कशाचा’ बसलाय झटका..

Advertisement

युद्धाचा ‘असा’ ही इफेक्ट..! शेजारी देशांमध्येही वाढलेत पेट्रोलचे भाव; पहा, ‘तिथे’ किती रुपयांना मिळतेय पेट्रोल..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply