Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक स्कूटर-कार घेणाऱ्यांना बसणार झटका.. ‘त्यामुळे’ कंपन्या दरवाढ करण्याच्या विचारात..

मुंबई: रशिया-युक्रेन युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) आणि बॅटरी उत्पादकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जीवनावश्यक घटकांच्या किमती वेगाने वाढत आहेत. जेव्हा देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल तेव्हा ही अडचण आणखी वाढू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढू शकते, असे सांगण्यात आहे. तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत या वाहनांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे जास्त मागणी मिळत नाही. त्यात सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे किंमती काही प्रमाणात कमी होतात. अशी परिस्थिती असताना किंमती वाढल्या तर वाहनांच्या मागणीत घट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी बहुतांश घटक दुसऱ्या देशांकडून खरेदी करावे लागतात. विशेषतः बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे निकेल, कोबाल्ट, लिथियम हे घटक परदेशातून आयात केले जातात. रशिया-युक्रेन युद्धामुळे आवश्यक कच्च्या मालाच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय, कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे चीनमध्ये अलीकडे जाहीर केलेले लॉकडाऊन ही काळजीत वाढ करणारे ठरत आहे. कारण, भारतात वापरल्या जाणार्‍या सेलपैकी सुमारे 90 टक्के सेल चीनमधून (China) आयात (Import) केले जातात.

Advertisement

देश अनेक घटकांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने बाजारातील किंमतींच्या परिणामाचा अंदाज लावणे कठीण आहे. नेक्सचार्ज कंपनीचे सीईओ (CEO) स्टीफन लुईस म्हणाले, की “आजकाल सर्व लिथियम-आयन बॅटरी आयात केले जातात. याचा अर्थ कच्च्या मालाच्या खरेदीत आमचा सहभाग नाही. अशा स्थितीत विक्रीच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

Advertisement

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये देशात 32,443 इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री झाली, जी वार्षिक 433 टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांमध्ये फेब्रुवारीमध्ये 297 टक्के वाढ दिसली, देशात एकूण 2,352 युनिट्सची विक्री झाली.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात प्रगत तंत्रज्ञानावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोलवरील वाहनांच्या बरोबरीने असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

वाव.. फक्त एका चार्जमध्ये 150 किलोमीटर.. आज देशात येतेय ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची मोठी घोषणा; फक्त ‘इतक्या’ अंतरावर मिळेल चार्जिंग स्टेशन; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply