Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ लोकांकडून सरकारने वसूल केले 350 कोटी रुपये; पहा, सरकारने कशामुळे केलीय कारवाई..

दिल्ली : कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये केरळ सरकारने दोन वर्षांत नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडून सुमारे 350 कोटींची कमाई केली. यामध्ये एकट्या मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून 214 कोटी रुपये वसूल करण्यात आले. दोन वर्षांत राज्य सरकारने 45000 लाखांहून आधिक कारवाई केली आहे.

Advertisement

केरळ राज्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले म्हणून सरकारने 350 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यापैकी 214 कोटी रुपये केवळ मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले. या दोन वर्षांत 45 लाखांपेक्षा जास्त कारवाया करण्यात आल्या. खरे तर, कोरोनाच्या काळात नियम मोडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केरळ सरकारने दिल्या होत्या. या दरम्यान, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या काळात सरकारने रकमेत 2 हजारांपर्यंत वाढ केली होती.

Advertisement

विशेष म्हणजे, केरळमध्येच देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जानेवारी 2020 मध्ये चीनमधून परतलेला वैद्यकीय विद्यार्थी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते. इतकेच नाही तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये सुद्धा केरळ आघाडीवर होते. सुरुवातीला, केरळ सरकारचे कोरोना नियंत्रण उपायांसाठी देखील कौतुक केले गेले होते परंतु नंतर केरळ हे कोरोना आजाराचे केंद्र बनले. बुधवारपर्यंत राज्यातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 67,476 झाली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत आणि या घातक विषाणूविरूद्ध वेगाने लसीकरण केले जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी म्हटले होते की, ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराचा धोका अद्याप संपलेला नाही. मात्र, कोरोनाचा प्रतिकार करण्यात अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशाने चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणाले, की ‘भारताने जगभरातील 99 देशांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) दिली आहे. फक्त 145 दिवसांत 250 दशलक्ष डोस दिले आहेत. आता देशात 181 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.

Advertisement

Corona Update : जगातील ‘या’ देशांमध्ये वेगाने वाढलाय कोरोना.. WHO ने दिलीय महत्वाची माहिती..

Advertisement

‘त्या’ ग्राहकांच्या जीवावर SBI झाली करोडपती; पहा नेमके कशा पद्धतीने केलेय नियमांचेही उल्लंघन..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply