Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Tata च्या ‘या’ प्लानमध्ये मिळणार ‘हा’ खास फायदा; मात्र, खर्च टळणार नाहीच.. जाणून घ्या, कसे ते..

मुंबई : टाटा प्ले फायबर (Tata Play Fiber) तीन महिन्यांच्या वैधतेसह अनेक ब्रॉडबँड (Broadband) योजना ऑफर करत आहे. तुम्हाला चांगला ब्रॉडबँड प्लान घ्यायचा असेल, तर टाटा प्ले फायबर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनी 50 एमबीपीएस स्पीडने सुरू होणाऱ्या आणि 1 जीबीपीएस स्पीडपर्यंत जाणारे काही प्लान ऑफर करत आहे. कंपनीने ऑफर केलेल्या तीन महिन्यांच्या ब्रॉडबँड प्लानशी संबंधित सर्व तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Advertisement

Tata Play Fiber 50 Mbps स्पीडसह बेस प्लान ऑफर करते. हा प्लान 1797 रुपयांना तीन महिन्यांसाठी म्हणजेच 599 रुपये प्रति महिना उपलब्ध आहे. लक्षात ठेवा की आम्ही येथे नमूद केलेल्या किंमतींमध्ये 18% कर समाविष्ट नाही. तसेच, 3.3TB डेटा सर्व योजनांमध्ये ऑफर करण्यात आला होता.

Advertisement

यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा 100 एमबीपीएस प्लान आहे जो तीन महिन्यांच्या पर्यायासाठी ओळखला जातो. 2400 रुपयांमध्ये हा प्लान येतो. त्यानंतर 150 Mbps, 200 Mbps, 300 Mbps, 500 Mbps, आणि 1 Gbps प्लान अनुक्रमे 3000, रु. 3300, रु. 4500, रु. 6900 आणि रु. 10,800 मध्ये येतात जे तीन महिन्यांसाठी चालतात.

Loading...
Advertisement

हे सर्व प्लॅन युजर्सना मोफत फिक्स्ड लाइन व्हॉइस कॉल कनेक्शन देखील देतात, परंतु यासाठी युजरला स्वतंत्रपणे इन्स्ट्रुमेंट खरेदी करावे लागेल. तसेच, यापैकी कोणतीही योजना कोणत्याही प्रकारच्या ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांसह येत नाही. Tata Play Fiber ने JioFiber, Airtel Xstream Fiber प्रमाणे नवीन वापरकर्त्यांना अधिक OTT ऑफर देऊ केल्या पाहिजेत.

Advertisement

मात्र, कंपनीने अद्याप याचा विचार केलेला नाही. तसेच प्लानमध्ये व्हॉइल कॉल कनेक्शन मोफत देण्याच्या नावाखाली लोकांना पैसे खर्च करण्यास भाग पाडले आहेच. कारण, फिक्स्ड लाइन व्हॉइस कॉल कनेक्शनसाठी स्वतंत्रपणे उपकरणे खरेदी करावी लागणार आहेत. म्हणजेच, पैसे खर्च करावेच लागणार आहेत.

Advertisement

फायदाच फायदा..! टाटाच्या ‘या’ प्लानमध्ये मिळतोय घसघशीत डिस्काउंट.. पहा, कसा मिळणार फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply