Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाचा मोठा निर्णय..! आता ‘त्या’ देशांना ‘अशा’ पद्धतीने द्यावे लागतील पैसे; पहा, काय आहे प्लान..

दिल्ली : युक्रेनवरील हमल्यानंतर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. त्यानंत आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) म्हणाले की आतापासून, “गैर-मैत्रीपूर्ण” देशांना नैसर्गिक वायू निर्यातीसाठी फक्त रूबलमध्ये पैसे द्यावे लागतील. पुतिन यांनी एका बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा आदेश दिला.

Advertisement

या बैठकीत पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितले की, अनेक पाश्चात्य देशांनी रशियन मालमत्ता जप्त करण्याचे बेकायदेशीर निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे त्यांच्या चलनांवर शंका निर्माण झाली आहे आणि विश्वास कमी झाला आहे. पुतिन म्हणाले, की आता युरोपियन संघ (European Union) आणि अमेरिकेने (America) रशिया बरोबर व्यापारासाठी डॉलर, युरोमध्ये पैसे देण्यात काहीच अर्थ नाही.

Advertisement

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले की, या देशांच्या धोरणानंतर उपाय म्हणून गैर-मित्र देशांसाठी चलन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुतिन यांनी सेंट्रल बँकेला (Central Bank) नैसर्गिक वायू खरेदीदारांना रशियामध्ये रुबल मिळविण्यासाठी एक धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नवीन धोरण कधीपासून प्रभावी होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पुतिन यांच्या घोषणेनंतर जगातील अनेक अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुतिन यांच्या या निर्णयामुळे रशियाचे चलनाला आधिक समर्थन मिळेल. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाचे चलन अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत मागे पडले आहे.

Advertisement

दरम्यान, युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केले म्हणून रशियाला (Russia) शिक्षा म्हणून त्याच्याकडील सोन्याचा साठा प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न अमेरिकेने सुरू केला आहे. याद्वारे रशिया अर्थव्यवस्थेवरील (Economy) प्रतिबंधांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातही अमेरिकेला अडचणी निर्माण करता येतील. सोन्याच्या मदतीने पुतिन देशाच्या अर्थव्यवस्थेस कोलमडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.

Loading...
Advertisement

या साठ्याला मंजुरी देऊन, आम्ही रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे करू आणि पुतिनच्या वाढत्या अडचणींमध्ये भर टाकू, असे अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकन राजकारण्यांचा असा विश्वास आहे की रशिया आपल्या राष्ट्रीय चलनाचे अवमूल्यन रोखण्यासाठी सोने साठ्याचा वापर करत आहे.

Advertisement

बाब्बो.. आता रशियाचा सोन्याचा साठा धोक्यात..! ‘त्यासाठी’ अमेरिकेने केलाय ‘हा’ खास प्लान..

Advertisement

रशियाला ‘त्या’ संघटनेतून बाहेर काढण्याचा अमेरिकेचा डाव; चीनने अमेरिकेला दिलाय ‘हा’ इशारा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply