दिल्ली: देशात आज आणखी एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. या स्कूटरचे खास वैशिष्ट्य म्हणजे सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटर चालण्यास सक्षम आहे. Okhi 90 असे या स्कूटरचे नाव आहे. लाँच करण्याआधी या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगितले जात आहे की, Okhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हाय-टेक फीचर्स, सिंगल चार्जमध्ये 150 किमी पर्यंत रेंज आणि इतर अनेक उत्तम फीचर्स मिळतील. ओकिनावा कंपनीने ही स्कूटर तयार केली आहे.
ओकिनावाने अलीकडेच त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल एक ट्विट केले आहे. ओकिनावा देशातील टॉप-10 इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादकांपैकी एक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Okhi 90 ही नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी ओकिनावाच्या पोर्टफोलिओमध्ये कमी-स्पीड आणि हाय-स्पीड दोन्ही स्कूटरची निवड देईल. एलईडी इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स असे फिचर्स असणे अपेक्षित आहे.
नवीन ई-स्कूटर ई-सिमसह येईल ज्यामुळे कनेक्टेड फिचर्स स्मार्टफोन अॅप्लिकेशनमध्ये वापरता येतील. याद्वारे स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हेईकल अलर्ट, जिओ फेन्सिंग, ई-कॉल, डायग्नोस्टिक्स यांसारखी अनेक वैशिष्ट्ये जोडण्यात येणार आहेत. कंपनीने स्कूटरच्या क्षमतेबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु यामध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो. टॉप स्पीड 80 किमी/ताशी असू शकतो आणि एका चार्जवर ती 150 किमी पर्यंत चालेल असा अंदाज आहे.
जरी Okinawa आज स्कूटर लाँच करणार आहे. त्यानंतर त्याची अधिकृत किंमत समोर येईल. पण सूत्रांचे म्हणणे आहे की या स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. बाजारात ते Ola S1, Simple One, Bajaj Chetak, TVS iQube, Ather 450X यांना टक्कर देईल.