Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BSNL कंपनीबाबत केंद्र सरकारचे मोठे वक्तव्य.. पहा, सरकारने नेमके काय म्हटलेय..?

मुंबई : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL च्या निर्गुंतवणुकीबाबत सरकारकडून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. सरकार बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीचा विचार करत नाही. वास्तविक, दळणवळण मंत्रालयाने लोकसभेत सांगितले की, सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नाही.

Advertisement

लोकसभेतील DMK खासदार डीएम कथीर आनंद यांनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीसाठी (disinvestment) कंपनीची मालमत्ता विचारात घेतली जाईल का, असे विचारले होते. त्यावर दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की “आतापर्यंत बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नाही.” इमारती, जमीन, टॉवर आणि दूरसंचार उपकरणांसह देशातील बीएसएनएलच्या स्थावर मालमत्तेची माहिती सरकारकडून मागवण्यात आली होती.

Advertisement

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बीएसएनएलच्या सर्व सर्कलमध्ये 3266 इमारती, 1388 टॉवर आणि उपग्रह, 21042 दूरसंचार उपकरणे आणि 686 नॉन-टेलिकॉम उपकरणे आहेत. टेलिकॉम उपकरणांमध्ये प्लांट, केबल, कॉम्प्युटर सर्व्हर, इन्स्टॉलेशन चाचणी उपकरणे, लाईन्स आणि वायर्स यांचा समावेश होतो. तर दूरसंचार नसलेल्या उपकरणांमध्ये संगणक उपकरणे, फर्निचर यांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

बीएसएनएलचा तोटा 2018-19 मध्ये दुपटीने वाढून 2017-18 च्या तुलनेत सुमारे 15,000 कोटी रुपये झाला. 2017-18 मध्ये 7,993 कोटी रुपये आणि 2016-17 मध्ये 4,793 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2019-20 मध्ये कंपनीला 15,499.58 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकत्रित तोटा 7,441.11 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. आर्थिक वर्ष 2021 मध्ये BSNL ची एकूण मालमत्ता 51,686.8 कोटी रुपयांवर घसरली आहे जी मागील वर्षी 59,139.82 कोटी रुपये होती. कंपनीचे थकित कर्ज आर्थिक वर्ष 2019-20 मधील 21,674.74 कोटी रुपयांवरून 2020-21 मध्ये वाढून 27,033.6 कोटी रुपये झाले.

Advertisement

BSNL ने दिलीय झटका देणारी बातमी.. ‘ही’ खास ऑफर होणार बंद ? ; फक्त ‘या’ राज्यात सुरू होती ऑफर..

Advertisement

पैसे वसूल रिचार्ज प्लान..! दररोज मिळतोय 5 GB डेटा.. तीन महिने रिचार्जचे टेन्शनच नाही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply