Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचा ‘असा’ ही इफेक्ट..! शेजारी देशांमध्येही वाढलेत पेट्रोलचे भाव; पहा, ‘तिथे’ किती रुपयांना मिळतेय पेट्रोल..

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्याचा परिणाम जगातील सर्व देशांवर झाला. सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्येही पेट्रोलच्या किमतीत 3 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. भारतापेक्षा नेपाळमध्ये (Nepal) स्वस्तात मिळणारे पेट्रोल आता स्वस्त राहिलेले नाही. येथे आता एक लिटर पेट्रोलची सरासरी किंमत 97.20 रुपये आहे. 22 मार्च रोजी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील दोन दिवसांत 1.60 रुपयांनी वाढले आहेत. आजही जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये आहे आणि सर्वात महाग हाँगकाँगमध्ये (Hongkong) आहे.

Advertisement

globalpetrolprices.com नुसार, हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत प्रति लिटर 219.81 रुपये झाली आहे. त्याच वेळी, व्हेनेझुएलामध्ये फक्त 1.90 रुपये खर्च करावे लागतात. जगात असे 5 देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 25 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, जगभरातील पेट्रोलची सरासरी किंमत 94.60 रुपये प्रति लिटरवरून 101.64 रुपये झाली आहे. तथापि, या किंमती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतात. वेगवेगळ्या देशांतील किमतीतील फरक हे पेट्रोलसाठी वेगवेगळे कर आणि सबसिडीमुळे आहे. तसे, भारतातील पेट्रोलची किंमत आता फक्त काही शहरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे आहे.

Advertisement

इतर शेजारी देशांबद्दल सांगितले तर, पाकिस्तानमध्ये (Pakistan) पेट्रोलची सरासरी किंमत 63.09 रुपये आहे आणि श्रीलंकेत (Sri lanka) 77.12 रुपये आहे. बांगलादेशात (Bangladesh) सध्या पेट्रोल 78.96 रुपये प्रति लिटर मिळत आहे. भूतानमध्ये (Bhutan) एक लिटर पेट्रोलची किंमत 86.28 रुपयांवर तर चीनमध्ये (China) 111.49 रुपयांवर पोहोचली आहे. 14 मार्च रोजी चीनमध्ये पेट्रोलची सरासरी किंमत 103.87 रुपये होती. जर आपण भारताबद्दल (India) सांगितले तर सरासरी किंमत 102.86 रुपये प्रति लिटर आहे. इथे आजही बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे.

Loading...
Advertisement

अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलनंतर ‘या’ इंधनानेही दिलाय झटका.. पहा, मोठ्या शहरांत किती वाढलेत भाव..

Advertisement

घर बांधणाऱ्यांना बसणार जोरदार झटका.. कंपन्यांनी ‘त्यामध्ये’ केलीय मोठी दरवाढ; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply