Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घर बांधणाऱ्यांना बसणार जोरदार झटका.. कंपन्यांनी ‘त्यामध्ये’ केलीय मोठी दरवाढ; जाणून घ्या..

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोळशाच्या (Coal) वाढलेल्या किमतीमुळे पोलाद निर्मात्यांनी स्टीलच्या (Steel) दरात प्रतिटन 2 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या वाढीनंतर घर बांधणे अधिक खर्चिक होऊ शकते. माहितीनुसार, जेएसडब्ल्यू स्टीलने 23 मार्चपासून रेबार स्टीलच्या किमतीत प्रति टन 1250 रुपयांची वाढ केली आहे. घरांच्या बांधकामात वापरले जाणारे पाइप हे रेबारपासून बनवले जातात. सरकारी मालकीच्या SAIL ने हॉट रोल्ड कॉइल (HRC) आणि कोल्ड रोल्ड कॉइल (CRC) च्या किमती प्रति टन 1500 रुपयांनी वाढ केल्या आहेत.

Advertisement

जिंदाल स्टील अँड पॉवरनेही स्टीलच्या दरात प्रतिटन 1500 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर, एचआरसीची किंमत 72,500 रुपयांवरून 73,500 रुपये प्रति टन, सीआरसीची किंमत 78,500 रुपयांवरून 79,000 रुपये प्रति टन आणि रेबारची किंमत 71,000 रुपयांवरून 71,500 रुपये प्रति टन झाली आहे. एप्रिलमध्ये किमती आणखी वाढू शकतात, असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. HRC चा वापर रेल्वे ट्रॅक, अवजड यंत्रसामग्री तयार करण्यासाठी केला जातो. कमी तापमानात काम करणारे मशीन आणि इतर वस्तू सीआरसीच्या माध्यमातून बनवल्या जातात.

Advertisement

कच्चा माल आणि उपकरणांच्या किंमती वाढल्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) किमती वाढू शकतात. दुचाकी ते चारचाकी वाहनांच्या किमती सहा ते आठ टक्क्यांनी वाढू शकतात, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. टाटा मोटर्स आणि एथर एनर्जीने याआधीच किमतीत वाढ केली आहे. हिरो इलेक्ट्रिक आणि कायनेटिक ग्रीन एनर्जी या कंपन्या सुद्धा दरवाढीचा विचार करत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील 5 राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या काही दिवसांत ही समस्या आणखी वाढणार आहे. कारण, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) 2.4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 118 च्या जवळ पोहोचल्या आहेत. गेल्या आठवड्यात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले होते. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रूड ऑइल पुन्हा $118 प्रति बॅरलच्या वर व्यापार करत आहे.

Advertisement

अर्र.. म्हणून घराचे स्वप्न होणार आधिक खर्चिक; पहा, कसा बसणार खिशाला झटका..!

Advertisement

म्हणून घर बांधणाऱ्यांना बसणार असाही झटका; बिल्डरचीही नसेल यातून सुट्टी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply