Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलनंतर ‘या’ इंधनानेही दिलाय झटका.. पहा, मोठ्या शहरांत किती वाढलेत भाव..

दिल्ली : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर आता सीएनजी-पीएनजी इंधनानेही लोकांना जोरदार झटका दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राजधानी दिल्लीत सीएनजीच्या (CNG Price) दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किमतीत वाढ इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने केली आहे.

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्ली सीएनजी 59.01 प्रति किलो दराने मिळत आहे. तसेच नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबादमध्ये 61.58 रुपये प्रति किलो, मुजफ्फरनगर, मेरठ, शामली 66.26 रुपये प्रति किलो, गुरूग्राम 67.37 रुपये, रेवाडी 69.48 रुपये, करनाल, कैथल 67.68 रुपये, कानपुर, हमीरपुर आणि फतेहपुर 70.82 रुपये, पाली आणि राजसमंदमध्ये 69.31 रुपये प्रति किलो या दराने मिळत आहे.

Advertisement

घरगुती पीएनजीच्या (PNG Price) किमतीत वाढ करण्यात आली आहे. 24 मार्चपासून एक रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 36.61/SCM (व्हॅटसह) असेल. या दरवाढीआधी दिल्लीतील देशांतर्गत पीएनजीची किंमत 35.61 रुपये प्रति एससीएम होती. पीएनजीच्या दरात या वर्षी जानेवारीत शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पीएनजीच्या किमती 50 पैशांनी वाढ केल्या होत्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर 137 दिवसांनंतर मंगळवारी म्हणजेच 22 मार्च रोजी 80 पैशांनी वाढले. त्यानंतर बुधवारीही दरात वाढ झाली. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेला नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशतील 5 राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या काही दिवसांत ही समस्या आणखी वाढणार आहे. कारण, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) 2.4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 118 च्या जवळ पोहोचल्या आहेत. गेल्या आठवड्यात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले होते. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रूड ऑइल पुन्हा $118 प्रति बॅरलच्या वर व्यापार करत आहे.

Advertisement

बाब्बो.. 100 रुपयांच्या पेट्रोलमध्ये आपण देतोय ‘इतका’ कर; पहा, तेलाने ‘कशी’ होतेय सरकारची चांदी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply