Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recharge Plan : प्रीपेडमध्ये जिओ भारीच.. ‘या’ कंपनीचे प्लान ठरलेत फेल; पहा, कोणते प्लान आहेत बेस्ट..

मुंबई : सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड प्लान्सचे दर मनमानी पद्धतीने वाढ केले आहेत. त्यामुळे लोकांना आता नेहमीच्या रिचार्जसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea लोकांच्या आवश्यकतेनुसार नवीन प्रीपेड योजना ऑफर करतात. ज्यामध्ये Jio कंपनी Airtel आणि Vodafone च्या तुलनेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन ऑफर करते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक जण एअरटेल आणि व्होडाफोनवरून जिओकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील काही प्लानची माहिती देणार आहोत. या प्लानमध्ये दररोज डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस मिळतात.

Advertisement

Vodafone Idea कंपनीच्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल मिळतात. या प्लानची वैधता फक्त 24 दिवस आहे. यामध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाही. जर तुम्हाला डेटासह अतिरिक्त फायदे हवे असतील तर 299 रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय असेल. या प्लानमध्ये दररोज 1.5 GB डेटा, 100 SMS प्रतिदिन अमर्यादित कॉल मिळतात. प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि दरमहा 2GB पर्यंत बॅकअप डेटा मिळतो. या प्लानमध्ये Vi Movies चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Advertisement

याबरोबरच, कंपनी 249 रुपयांचा प्लान देखील ऑफर करते ज्यामध्ये दररोज 1GB पेक्षा जास्त डेटा मिळतो. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा लाभ मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलसह दररोज 100 एसएमएस मिळतात. तथापि, प्रीपेड प्लानची ​​वैधता केवळ 21 दिवस आहे. यामध्ये Vi Movies मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Loading...
Advertisement

Reliance Jio
रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा प्रीपेड प्लान आहे, जो अमर्यादित व्हॉइस कॉलसह दररोज 1.5GB डेटा ऑफर करतो. दररोज 100 एसएमएस मिळतात. प्रीपेड प्लानची ​​वैधता 28 दिवसांची आहे. तसेच, यामध्ये Jio Movies, Jio Cloud सह अन्य फायदे मिळतात.

Advertisement

Jio चा 199 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील आहे. हा प्लान दररोज 1.5GB डेटासह येतो, अमर्यादित व्हॉइस कॉल ऑफर करतो आणि दररोज 100SMS ऑफर करतो. हा प्लान 23 दिवसांच्या वैधतेसह येतो. जरी वैधता कमी असली तरी प्लानमध्ये तुम्हाला जास्त डेटा मिळतो. त्यानंतर आणखी एक प्लान आहे ज्याची किंमत 249 रुपये आहे. प्रीपेड प्लान दररोज 2GB डेटासह येतो, अमर्यादित व्हॉइस कॉल ऑफर करतो आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लानमध्ये Jio Movies, Jio Cloud मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Advertisement

एकदाच रिचार्ज करा अन् रिचार्जचे टेन्शन विसरा.. ‘हे’ आहेत जास्त दिवस चालणारे प्लान; पहा, काय आहेत फायदे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply