मुंबई : देशात आजमितीस सर्वाधिक होंडा कंपनीच्या Activa विक्री होतात. पण त्यानंतर अशीही एक स्कूटर आहे जी विक्रीच्या बाबतीत अॅक्टिव्हानंतर दुसऱ्या क्रमांकावर असते. आम्ही टीव्हीएस ज्युपिटरबद्दल (TVS Jupiter) माहिती देत आहोत जी देशात सर्वाधिक विक्री होणार्या स्कूटरपैकी एक आहे. फेब्रुवारी महिन्यात 47,092 दुचाकींची विक्री झाली. कमी किंमत, उत्तम मायलेज यामुळे या स्कूटरला देशभरात मागणी आहे. ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हाला (Honda Activa) जोरदार टक्कर देत आहे.
TVS Jupiter मध्ये, कंपनीने 124.8 cc सिंगल एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 8.3 PS पॉवर आणि 10.5 Nm टॉप टॉर्क निर्माण करते. हे इंजिन CVT गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन लिनियर पॉवर आणि टॉर्क निर्माण करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याच वेळी, कंपनीने यामध्ये 124 cc इंजिन वापरले आहे, जे 8.29PS पॉवर आणि 10.3Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे एकूण वजन 111 किलो आहे आणि कंपनीने या स्कूटरमध्ये काही खास वैशिष्ट्ये दिली आहेत.
TVS Jupiter STD मॉडेलची ऑन-रोड किंमत 87782 रुपयांपासून सुरू होते आणि 95376 (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, Honda Activa ची किंमत 87211 पासून सुरू होते आणि 96076 (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जाते. TVS ज्युपिटरबाबत कंपनीचा दावा आहे की ते 64 kmpl पर्यंत मायलेज देते. दुसरीकडे, Honda Activa साधारणपणे 50 ते 55 kmpl चा मायलेज देते.
TVS ज्युपिटरमध्ये, कंपनीने या स्कूटरमध्ये इंटेल-गो तंत्रज्ञान, डिस्क ब्रेक, यूएसबी सॉकेट यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिली आहेत. ही स्कूटर तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय Honda Activa 125 ला LED हेडलॅम्प, पुढच्या बाजूला LED पायलट दिवा, बाह्य इंधन फिलर कॅप, साइड-स्टँड इंजिन मिळते. Honda चा दावा आहे की ही नवीन मोटर आधीपेक्षा 13 टक्के जास्त मायलेज देते.