मुंबई : बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या आधी मंगळवारी 137 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत आता 97.01 रुपयांवर पोहोचली आहे, जी आधी 96.21 रुपये होती. त्याच वेळी, डिझेलचा दर 87.47 रुपये प्रति लिटरवरून आता 88.27 रुपये झाला आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर 85 पैशांनी वाढून 111.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 75 पैशांनी वाढून 102.91 रुपये प्रति लिटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोलचे दर 105.51 रुपयांवरून 106.34 रुपये प्रति लिटर झाले आहेत. मुंबईत डिझेलच्या दरात प्रतिलिटर 85 पैशांनी वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबर 2021 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. स्थानिक करानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये दर देखील भिन्न आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लानिंग अँड अॅनालिसिस विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील लोकांना 100 रुपयांच्या पेट्रोलवर 45.3 रुपये कर भरावा लागतो. यामध्ये 29 रुपये केंद्रीय कर आणि 16.3 रुपये राज्य कर आहे. स्टॅट ऑफ इंडिया नावाच्या ट्विटर हँडलने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात दर 100 रुपयांच्या पेट्रोलमागे लोकांना जवळपास निम्मी रक्कम कर म्हणून भरावी लागते.
प्रत्येक 100 रुपयांच्या पेट्रोलसाठी महाराष्ट्रात 52.5 रुपये, आंध्र प्रदेशात 52.4 रुपये, तेलंगणामध्ये 51.6 रुपये, राजस्थानमध्ये 50.8 रुपये, मध्य प्रदेशमध्ये 50.6 रुपये, केरळमध्ये 50.2 रुपये आणि बिहारमध्ये 50 रुपये आहे कराच्या रुपाने गोळा केले जातात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये राज्य कर हे केंद्रीय उत्पादन शुल्क करापेक्षा खूप जास्त आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान, देशात आजही इंधनाचे दर वाढले आहेत. या दरवाढीने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अनेक दिवसांपासून महागाई वेगाने वाढत चालली आहे. या महिन्यात तर पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅस तसेच अन्य महागाईत मोठी वाढ झाली आहे. सध्याच्या काळात महागाई कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. उलट आगामी काळात पेट्रोल डिझेलसह महागाई आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?
बापरे.. किती ही महागाई..! आता स्कूटर खरेदीही देणार टेन्शन; ‘या’ कंपनीने केलीय दरवाढीची घोषणा..