Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : सतत बदलतोय सोन्या-चांदीचा भाव.. पहा, आज काय आहेत नवीन दर..

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने बदलत आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले होते. सोने चांदीवर युक्रेन युद्धाचाही परिणाम जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर नाहीत. कधी कमी तर कधी जास्त होत असतात. आज मार्केटमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. मागील ट्रेडमध्ये मात्र सोन्याचे भाव 47 हजार 400 रुपये असे होते. गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, चांदीचे भाव 68 हजार 900 रुपये प्रति किलो असे आहेत.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले असून सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याचा साठा वाढून 1,067.3 टन झाला, जो मार्च 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे, असेही सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी वाढ दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोने लवकरच 60 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

पहिल्याच दिवशी खुशखबर..! आजही सोने-चांदी स्वस्त; खरेदीआधी जाणून घ्या किती रुपयांनी दर घटले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply