Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BSNL ने दिलीय झटका देणारी बातमी.. ‘ही’ खास ऑफर होणार बंद ? ; फक्त ‘या’ राज्यात सुरू होती ऑफर..

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या (BSNL) दृष्टीने महत्वाची बातमी आहे. बीएसएनएलएने एक ऑफर सुरू केली होती. या ऑफरची (Offer) मुदत आता 31 मार्च रोजी संपणार आहे. वास्तविक BSNL ने जानेवारी 2022 मध्ये आपल्या युजर्सना मोफत 4G सिम कार्ड (4G Sim Card) देत असल्याची घोषणा केली होती. पण 4G सिम कार्ड मोफत मिळवण्याची ही ऑफर आता 31 मार्च 2022 रोजी संपत आहे.

Advertisement

बीएसएनएल नवीन आणि मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (Portability) युजर्सना मोफत 4G सिम देत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाइल नंबर BSNL वर पोर्ट करायचा असेल, तर हीच योग्य वेळ आहे कारण यावेळी तुम्हाला BSNL 4G सिम कार्ड पूर्णपणे मोफत मिळू शकते. सिमकार्ड अॅक्टिव्ह करताना नवीन किंवा MNP युजर्सना फक्त रिचार्जची रक्कम भरावी लागेल. BSNL कडे 106 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्रीपेड प्लॅनची ​​मोठी यादी आहे. तुम्ही ही ऑफर घेतली नाही तर तुम्हाला अतिरिक्त सिम शुल्क द्यावे लागू शकते.

Loading...
Advertisement

BSNL मोफत 4G सिम ऑफर BSNL कस्टमर सर्विस केअर (BSNL CSC) आणि BSNL रिटेल आउटलेट्समधून मिळू शकते. BSNL मोफत सिम मिळवण्यासाठी ग्राहकांना आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्रात किंवा जवळच्या BSNL रिटेलर शॉपमध्ये देणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की ही ऑफर फक्त BSNL केरळ टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, की वापरकर्त्यांना सिम कार्ड मिळविण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. BSNL चे 4G सिम कार्ड घेण्याचे अनेक फायदे आहेत.

Advertisement

पैसे वसूल रिचार्ज प्लान..! दररोज मिळतोय 5 GB डेटा.. तीन महिने रिचार्जचे टेन्शनच नाही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply