Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘तिथे’ साखर मिळतेय 290 रुपये किलो.. पहा, चीनच्या कर्जात कसा फसलाय ‘हा’ देश..

दिल्ली : चीनचे कर्ज परत करताना श्रीलंका (Srilanka) अगदीच हैराण होत आहे. चीनच्या कर्जात आधीच श्रीलंकेने सामरिकदृष्ट्या महत्वाचे हंबनटोटा बंदर गमावले आहे. आता या कर्जामुळे हा देश दिवाळखोर होण्याचा धोका वाढला आहे. देशातील परकीय चलनाचा साठा एका दशकातील सर्वात कमी पातळीवर पोहोचला आहे. चीनचे (China) श्रीलंकेवर 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज (Loan) आहे. गेल्या वर्षी, देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चीनकडून आणखी 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. पुढील 12 महिन्यांत श्रीलंकेला देशी आणि विदेशी कर्ज परत करण्यासाठी सुमारे $7.3 अब्ज डॉलरची गरज आहे. नोव्हेंबरपर्यंत, देशातील परकीय चलनाचा साठा केवळ $1.6 अब्ज होता.

Advertisement

श्रीलंकेने चीनकडून कर्ज घेतलेले काही पायाभूत प्रकल्प रखडले. दक्षिण श्रीलंकेतील हंबनटोटा येथे बंदर बांधण्यासाठी चीनकडून $1.4 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते, परंतु ते कर्ज परत दिले जाऊ शकले नाही. अखेर 2017 मध्ये ते 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर एका चिनी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. चीनकडून मिळणारी सुलभ कर्जेही त्यासाठी अडचणीची ठरली आहेत. श्रीलंकेची आर्थिक स्थिती चीनचे कर्ज परत करण्याइतकी भक्कम नाही. आता तो पुन्हा चीनकडून 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याची तयारी करत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 पर्यंत श्रीलंकेवर एकूण 35 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज होते.

Advertisement

त्याच वेळी, आर्थिक तंगी आणि अन्न टंचाईमुळे, श्रीलंकेच्या जाफना आणि मन्नार प्रदेशातून श्रीलंकन नागरिक भारतातील तामिळनाडू राज्यात येत आहेत. वाढती बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि अन्नधान्याच्या दुष्काळामुळे श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना आणि मन्नार प्रदेशातून आणखी श्रीलंकन नागरिक येऊ शकतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या आठवड्यात सुमारे 2,000 निर्वासित नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

श्रीलंकेत सध्या तांदूळ (Rice) आणि साखर (Sugar) 290 रुपये किलोने विकली जात आहे. 400 ग्रॅम दूध पावडरची (Milk Powder) किंमत 790 रुपये आहे. गेल्या तीन दिवसांत दूध पावडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. श्रीलंका सरकारने पेपर्सच्या कमतरतेमुळे शालेय परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, अशा अनेक अडचणी या देशात निर्माण झाल्या आहेत.

Advertisement

कर्जाने बेहाल.. महागाईने केले हैराण; आता लोकही सरकारवर भडकले; पहा, काय सुरू आहे ‘या’ देशात..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply