एकदाच रिचार्ज करा अन् रिचार्जचे टेन्शन विसरा.. ‘हे’ आहेत जास्त दिवस चालणारे प्लान; पहा, काय आहेत फायदे..
मुंबई : एकदा रिचार्ज केल्यानंतर जास्त दिवस चालणारे प्लान्सना आजकाल जास्त मागणी आहे. यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास कमी होतो. हे लक्षात घेऊन, Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea या कंपन्या काही सर्वोत्तम दीर्घकालीन प्लान ऑफर करत आहेत. या प्लान्समध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो आणि एक वर्षापर्यंत वैधता (Validity) उपलब्ध आहे.
Reliance Jio
कंपनी 1.5 GB दैनंदिन डेटा आणि दीर्घ वैधतेसह दोन उत्कृष्ट प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीचे हे प्लॅन 666 रुपये आणि 2545 रुपयांचे आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 GB डेटा देते. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएससह देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉल (Unlimited Call) उपलब्ध आहे. कंपनीचा 666 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याच वेळी 2545 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही 336 दिवस वैधता मिळते.
Airtel
कंपनी 666 आणि 719 रुपयांचे प्लान ऑफर करते. 666 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 जीबी डेटा देते. 77 दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस (SMS) आणि अमर्यादित कॉल देखील मिळतात. कंपनी या प्लानमध्ये 30 दिवसांसाठी Amazon Prime Video च्या मोफत चाचणी (Subscription) देखील देत आहे.
जर आपण 719 रुपयांच्या प्लानबद्दल सांगितले तर 84 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल, दररोज 100 विनामूल्य एसएमएससह दररोज 1.5 जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Xstream मोबाइल पॅकसह 30 दिवसांसाठी Amazon Prime Video ची मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.
Vodafone-Idea
Airtel प्रमाणे कंपनी आपल्या यूजर्सना 666 आणि 719 रुपयांचे प्लान ऑफर करत आहे. कंपनीच्या 666 रुपयांच्या प्लानमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉल देखील मिळतात. Weekend Data Rollover, Vi Movies मोफत सबस्क्रिप्शन आणि Data Delights सह TV यांसह 77 दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत.
दुसरीकडे, कंपनीच्या 719 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा, दररोज 100 मोफत एसएमएस आणि 84 दिवसांच्या वैधतेसह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल मिळतात. प्लानमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे 666 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत.
फक्त एकाच रिचार्जमध्ये 5 लोक टेन्शन फ्री; टेलिकॉम कंपन्यांचे ‘हे’ आहेत बेस्ट फॅमिली पोस्टपेड प्लान..