Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. देशातील ‘या’ 11 शहरांत ‘गॅस’ गेलाय 1 हजार पार; पहा, यामध्ये तुमचेही शहर आहे का..

मुंबई : देशातील 5 राज्यांतील निवडणुका (Election) संपल्यानंतर लगेच महागाईने (Inflation) आणखी धक्के देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीआधी महागाईबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. आता एकामागून एक दरवाढीचे निर्णय होताना दिसत आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलनंतर (Diesel) आता तेल कंपन्यांनी घरगुती गॅस टाकीच्या (LPG Gas) दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे काही शहरांत गॅस टाकीच्या दर एक हजार रुपयांच्याही पुढे गेले आहेत. आता इतके जास्त पैसे देऊन गॅस टाकी खरेदी करणे सर्वसामान्यांना त्रासाचे ठरत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी मात्र जास्त वाढल्या आहेत.

Advertisement

यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस टाकीच्या दराने 1000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. बिहारच्या सुपौल जिल्ह्यात LPG गॅस टाकी 1055 रुपयांना मिळत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोचे विनाअनुदानित गॅस टाकी 949.50 रुपयांना मिळणार आहे. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये गॅस टाकीची किंमत 1031 रुपये आहे. तर मुरैना येथे 1033 रुपयांना मिळत आहे. बिहार राज्यातील सुपौलमध्ये 1055 रुपये, राजधानी पाटणा शहरात 1048 रुपये, भागलपूरमध्ये 1047.50 रुपये दराने तर औरंगाबादमध्ये 1046 रुपयांनी गॅस टाकी मिळत आहे.

Advertisement

झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यात गॅस टाकीचे दर 1007 रुपये तर राजधानीचे शहर रांचीमध्ये सुद्धा 1007 रुपयांना गॅस टाकी मिळत आहे. छत्तीसगड राज्यातील कांकेरमध्ये 1038 रुपये तर राजधानीचे शहर रायपूरमध्ये एलपीजी गॅस टाकी 1021 रुपयांना मिळत आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे नव्या दरवाढीमुळे एलपीजी गॅस टाकीचे दर आता 1019 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, दिल्ली, मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये गॅस टाकीची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर राज्यांतील परिस्थिती पाहता येणारा काळ सर्वसामान्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. 1 मार्च 2021 रोजी दिल्लीत LPG गॅसची किंमत 819 रुपये होती, जी आता 949.50 रुपये झाली आहे. महागाई अशीच वाढत राहिली तर पुन्हा जुने दिन येतील, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

गेल्या 8 वर्षांत एलपीजी गॅसची (14.2 किलो) किंमत दुप्पट वाढून 949.50 रुपये प्रति टाकी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार वाढला आहे. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस टाकीची किंमत 410.5 रुपये होती, जी आता 949.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Advertisement

निवडणुकीनंतर ‘आम आदमी’ ला जोरदार झटका..! घरगुती गॅस टाकीचे दरात मोठी वाढ; पहा, किती रुपये वाढलेत भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply