Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ग्रामीण भागात सुरू करता येतील ‘हे’ बिजनेस; सरकार करेल मदत, मिळेल उत्पन्नाचीही हमी..!

अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात अनेकांनी स्वतःचा काहीतरी बिजनेस (Business) सुरू करण्याचा विचार केला, अनेकांनी तर हा विचार प्रत्यक्षात आणून बिजनेस सुरू देखील केला. आजही अनेक जण नवीन बिजनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत. असे बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण अगदी घरुन सुद्धा करू शकतो. तसेच नोकरदार मंडळींना त्यांचा रोजगार सांभाळूनही व्यवसाय करता येणे शक्य होते.

Advertisement

अशा परिस्थितीत जर तुम्ही गावात राहत असाल आणि व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक बिजनेस आयडीया (Business Idea) देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा बिजनेस सुरू करुन चांगले उत्पन्न मिळवू शकता. हे असे बिजनेस जे तुम्ही ग्रामीण भागातही (Rural) अगदी सहज सुरू करू शकता.

Advertisement

तुम्हीही ग्रामीण भागात राहत असाल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुमच्यासमोर रोजगाराच्या (Employment) अनेक संधी उपलब्ध होतील. बिजनेससाठी कमी गुंतवणूक (Investment) करावी लागते, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ग्रामीण भागात सुरू करण्यासारख्या बिजनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ग्रामीण भागात बिजनेस सुरू करता येईल. माती माहितीसाठी प्रयोगशाळा (Lab For Soil Information) आणि जनावरांसाठी चारा उत्पादन (Animal Feed Business) हे ते दोन बिजनेस आहेत.

Loading...
Advertisement

ग्रामीण भागात बहुतेक लोक शेती (Agriculture) आणि पशुपालन करतात. अशा परिस्थितीत तुम्ही शेत जमिनीतील मातीची माहिती देण्यासाठी माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करू शकता. याद्वारे शेतकऱ्यांना जमिनीतील पोषक घटकांची माहिती देता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा ग्रामीण बिजनेस सरकारी मदतीने सुरू करू शकता.

Advertisement

सध्या जनावरांची संख्या सुमारे 53 कोटी असल्याचा अंदाज आहे. जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी चारा अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ग्रामीण भागात पशुखाद्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही हे 2 ग्रामीण भागातील बिजनेस (Rural Business Idea) सुरू केलेत, तर तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

वाव.. फक्त 10 हजार रुपयांत सुरू करता येईल ‘हा’ बिजनेस.. कमाई सुद्धा होईल दमदार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply