दिल्ली : देशातील वाढत्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर आज प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) केंद्र सरकार विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. देशातील लोकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यावर आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session)कामकाजा दरम्यान जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. या गदारोळामुळे राज्यसभा (Rajyasabha) आणि लोकसभेचे (Loksabha) कामकाज तहकूब करण्यात आले.
काल म्हणजेच मंगळवारीही विरोधी पक्षांनी महागाईवरून राज्यसभेत गदारोळ केला होता. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस खासदारांनी मोदी सरकार विरोधात निदर्शने केली. एलपीजी गॅस, (LPG Gas) पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले की, निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढ कराव्या लागल्या, निवडणुकांमुळे ते थांबवण्यात आले होते. निवडणूक (Election) आटोपल्यानंतर किमती वाढ करण्यात आल्याचे खडगे म्हणाले.
विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोधी सदस्यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे राज्यसभेत गदारोळ झाला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज म्हणजेच बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. याआधी मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-70 पैशांनी वाढ करण्यात आली होती. एलपीजीच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?
अर्र.. फक्त पेट्रोल-डिझेलच नाही तर, ‘त्यामुळे’ सुद्धा बिघडलेय ‘आम आदमी’ चे बजेट; जाणून घ्या..