Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Electric Car खरेदीचा आहे प्लान..? ; मग, थोडं थांबा..! 2 वर्षात किंमती होणार कमी; जाणून घ्या, कसे ते..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती (Petrol Diesel Price) दरम्यान तुम्हीही इलेक्ट्रिक कार (Electric Car) घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण, लवकरच इलेक्ट्रिक कारची किंमत कमी होणार आहे. तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेमध्ये वेगाने होत असलेल्या बदलांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) किमती कमी होतील. येत्या दोन वर्षांत त्यांची किंमत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या इतकीच असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

Advertisement

मंगळवारी लोकसभेत ‘2022-23 या आर्थिक वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदान मागणी’ या मुद्यावरील चर्चेला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, किफायतशीर आणि स्वदेशी इंधनावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात लवकरच अशा इंधनावर वाहने चालतील आणि देशातील प्रदूषणाची (Air Pollution) पातळी कमी होईल. ते म्हणाले की, हायड्रोजन (Hydrogen) हे लवकरच सर्वात स्वस्त पर्यायी इंधन असेल. जास्तीत जास्त दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील आणि त्यांची किंमत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने असेल.

Advertisement

गडकरी म्हणाले, की “मी असे म्हणू शकतो की जास्तीत जास्त दोन वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि ऑटोरिक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार आणि ऑटोरिक्षा यांच्या बरोबरीने असतील. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन आणि सोडियम-आयन बॅटरी विकसित करण्यावरही काम करत आहोत. यामुळे तुमचा वाहनांवरील खर्च 10 पटीने कमी होईल. जर तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनावर 10 रुपये खर्च कराल.”

Loading...
Advertisement

सध्या, टाटा, एमजी आणि टोयोटा (Toyota) सारख्या कार कंपन्या देशात त्यांच्या इलेक्ट्रिक कारची विक्री करतात. मात्र, सध्या या कारची किंमत खूप जास्त आहे. टाटा कंपनीची लोकप्रिय कार Nexon EV ची किंमत 14.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. सध्या देशात विकल्या जाणार्‍या बहुतेक प्रवासी कारपेक्षा ही किंमत खूप जास्त आहे. जर त्यांची किंमत कमी झाली तर ते खूप किफायतशीर होतील आणि कारची विक्री वाढेल असे अपेक्षित आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची मोठी घोषणा; फक्त ‘इतक्या’ अंतरावर मिळेल चार्जिंग स्टेशन; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement

टोलनाक्यांसाठी सरकारचा मेगा प्लान..! 60 किलोमीटर अंतरात फक्त एक टोलनाका; ‘या’ लोकांना मिळणार खास फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply