मोदी सरकारसाठी खुशखबर..! ‘त्यामध्ये’ प्रथमच केलेय ‘हे’ रेकॉर्ड; पहा, देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा होतोय फायदा..
मुंबई : कोरोना संकटाचा फटका आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताने 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे (Export) लक्ष्य गाठले आहे. हे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कालावधीच्या 9 दिवस आधीच पूर्ण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, भारतातून दररोज सरासरी 1 अब्ज डॉलरची निर्यात होते. त्याच वेळी, महिन्यापर्यंत दरमहा 33 अब्ज डॉलर वस्तू निर्यात झाली.
भारताच्या या दमदार कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. पंतप्रधानांनी म्हटले की, ‘भारताने प्रथमच 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. आमच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने भारताची आयातही (Indian Import) 36 टक्क्यांनी वाढली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे किमतीत वाढ होऊनही फेब्रुवारी महिन्यात देशात बहुतांश घडामोडी स्थिर राहिल्या. या संकटाचा फारसा परिणाम जाणवला नाही.
दरम्यान, सन 2022 मध्ये भारताची निर्यात वाढून 530 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता असल्याचे फिओ या निर्यातदारांच्या प्रमुख संघटनेने म्हटले होते. कोरोनाचा निर्यातीला मोठा फटका बसला होता. मात्र आता वाढते लसीकरण आणि वेगाने कमी होणारी कोरोना रुग्णांची संख्या यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. निर्यातदारांना मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये विक्रमी वाढ झाली असून, या वर्षात देशातून विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होणार असल्याचे संघटनेने म्हटले होते. त्यानुसार या वर्षातील मार्च महिन्यापओर्यंत भारताने 400 अब्ज निर्यातीचा टप्पा गाठला आहे. सध्याच्या काळात या क्षेत्रात आणखीही संधी आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्यात आधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्योग व व्यापार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये निर्यातीत तब्बल 36.2 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलियम पदार्थ वगळता अन्य वस्तू व सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये चालू महिन्यात 28 टक्के वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांचा विचार केला तर निर्यात जवळपास 40 टक्क्यांनी वाढली आहे. आता यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.