Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढणार गव्हाचेही भाव..! पहा कशाचा परिणाम होणार आहे बाजारामध्ये

मुंबई : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्या युद्धामुळे महागाईच्या आगडोंबाला आणखी उसळी घेण्याची संधी मिळाली आहे. युद्धाच्या अडून सरकारने इंधन दरवाढ (Petrol price hike) थोपवली आहे. तर, बाजारात चिकनपासून (chicken rate) अनेक घटकांची भाववाढ करण्याची पर्वणी व्यापाऱ्यांनी साधली आहे. अशावेळी आता भारतीय गहू उत्पादकांनाही (wheat producer farmers) याचा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशिया आणि युक्रेनकडून होणारा गव्हाचा पुरवठा ठप्प झाल्याने जगाची डोकेदुखी वाढली आहे.  हे दोन्ही देश गव्हाच्या मोठ्या निर्यातदारांपैकी असल्याचा हा परिणाम आहे. परिणामी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश भारताला प्रमुख आयातदार (Importer) देशांमध्ये जाण्याची संधी खुली झाली आहे. गव्हाच्या निर्यातीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार पुरेशी रेल्वे मालवाहतूक उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असून गव्हाच्या खेपेसाठी टर्मिनल आणि कंटेनरची संख्या वाढवण्यासही बंदर अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने याबाबत बैठक घेतली आहे. भारताला गव्हाच्या निर्यातीसाठी मोठी ऑर्डर मिळू शकते. गव्हाचा सर्वात मोठा आयातदार असेलेल्या इजिप्तसोबत या संदर्भात अंतिम फेरीची चर्चा सुरू आहे. यासोबतच भारत सरकारची चीन आणि तुर्कस्तानसारख्या मोठ्या आयातदारांशीही अशीच चर्चा सुरू आहे. (wheat import export world scenario)

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply