दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रति लिटर 80 आणि 70 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील महागाई (Inflation) काही नवीन नाही. याआधीही दूध, सीएनजी आणि मॅगीच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत सीएनजीच्या दरात 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, दिल्ली शेजारील भागात प्रति किलो 1 रुपये वाढ करण्यात आली.
या महिन्याच्या सुरुवातीला नेस्ले कंपनीने (Nestle) मॅगीच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली होती. मॅगीचे छोटे पॅकेट आता 12 रुपयांऐवजी 14 रुपयांना विकले जात आहे. मोठ्या पॅकसाठी ग्राहकांना 3 रुपये अधिक द्यावे लागतील. त्याचप्रमाणे नेसकॅफे क्लासिक, ताजमहाल चहाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. अमूल, पराग यांनी दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे.
मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 आणि 70 पैशांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर आता 95.41 रुपयांवरून 96.21 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटरवरून 87.47 रुपये झाला आहे. 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यासह राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी टाकीची किंमत 949.50 रुपये झाली आहे. 6 ऑक्टोबर 2021 रोजी एलपीजी दरात शेवटची सुधारणा करण्यात आली होती. जुलै ते ऑक्टोबर 2021 दरम्यान एलपीजीच्या किमतीत प्रति सिलिंडर 100 रुपयांनी दर वाढले होते.
येत्या काही महिन्यांत एसी, कुलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक (Electronics) वस्तूंच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. वाढत्या खर्चामुळे दोन वर्षांत कंपन्यांनी आधीच तीन वेळा किमती वाढवल्या आहेत. आता पुन्हा एकदा महागाईचा झटका देण्याची तयारी सुरू आहे.
राहा तयार..! महागाईचा आणखी बसणार झटका; ‘त्या’ कंपन्या लवकरच करणार दरवाढ..
महागाईने आम आदमी हैराण..! राहुल गांधी यांनी मोदी सरकारकडे केलीय ‘ही’ मागणी..