Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टोलनाक्यांसाठी सरकारचा मेगा प्लान..! 60 किलोमीटर अंतरात फक्त एक टोलनाका; ‘या’ लोकांना मिळणार खास फायदा..

दिल्ली : आगामी काळात महामार्गावरील प्रवास आणखी स्वस्त होणार आहे. कारण, सरकारला याची काळजी वाटत असून त्यादृष्टीने आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार एका निश्चित कालावधीत एक वेळाच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे.

Advertisement

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल, तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, की सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल नाका कार्यरत असेल. नितीन गडकरी म्हणाले की, 60 किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील.

Loading...
Advertisement

केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास दिला जाईल. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा तर मिळेलच, पण अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास तयार होतील. वास्तविक, महामार्गावरील वाहतूक वाढ करुन टोलचे उत्पन्न वाढ करण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांची नेहमीच मागणी असते की, त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी, कारण त्यांना त्या मार्गावरुन सतत प्रवास करावा लागतो. प्रत्येक वेळी टोल देणे शक्य नाही. यामुळे या लोकांना मोठा खर्च करावा लागत होता. आता मात्र त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply