Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे दर वाढले.. चेक करा काय आहेत नवीन भाव..

मुंबई : आज सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) तेजी दिसून आली. मंगळवारी सोने आण चांदीचे भाव वाढले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 165 रुपये तर चांदीच्या दरात 461 रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने 51 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 68 हजार 810 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

Advertisement

मार्केटमध्ये आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 48354 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 52750 रुपये आहे. 20 कॅरेटचा 10 ग्रॅमसाठीचा भाव 43958 रुपये, तर 18 कॅरेटचा भाव 39563 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव 69600 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Advertisement

आतंरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मौल्यवान धातू मोठ्या वाढीसह ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 1936.40 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदी 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 25.32 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले असून सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याचा साठा वाढून 1,067.3 टन झाला, जो मार्च 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे, असेही सांगण्यात येत आहे.

Advertisement

युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी वाढ दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोने लवकरच 60 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply