Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फक्त 10 हजार रुपयांत सुरू करता येईल ‘हा’ बिजनेस.. कमाई सुद्धा होईल दमदार..

अहमदनगर : एखादा बिजनेस (Business) सुरू करायचा म्हटले की त्यामध्ये अडचणी येणारच. कोणताही बिजनेस सुरू करणे सोपे नाही. यामध्ये अनेक घटक असतात. असे असले तरी तुम्ही जर योग्य नियोजन करुन सर्व प्रकारची माहिती आणि अभ्यास करुन व्यवसाय सुरू केला तर बिजनेस यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि कोणता बिजनेस योग्य असेल हे ठरवू शकत नसाल, तर आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देणार आहोत. हा व्यवसाय करून भरपूर कमाई कराल. याद्वारे तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकाल. हा बिजनेस आहे लोणचे तयार करण्याचा. (Pickle Making Business) आपल्याकडे लोणच्याला मोठी मागणी आहे. चला, तर मग या बिजनेसबद्दल आधिक माहिती घेऊ या..

Advertisement

तुम्ही फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीने लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा 30 ते 40 हजार रुपये कमवू शकता. लोणचे बनवण्यासाठी तुमच्याकडे साधारण 900 चौरस फूट (Square Foot) जागा असणे आवश्यक आहे. लोणचे तयार करणे, वाळवणे आणि पॅकिंगसाठी (Packing) मोठी आणि मोकळी जागा लागते. याशिवाय, लोणचे (Pickle) साफसफाई आणि योग्य पद्धतीने तयार करावे लागेल जेणेकरून तुमचे लोणचे लवकर खराब होणार नाही. लोणचे बनवल्यानंतर मार्केटिंग ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. चांगल्या विपणन (Marketing) धोरणाचा वापर करून तुम्ही तुमचे लोणचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊ शकता.

Loading...
Advertisement

याशिवाय, तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन प्रयोग करावे लागतील. जर तुम्ही हे नियोजनबद्ध पद्धतीने केले तर हळूहळू तुमचे लोणचे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत दर महिन्याला लोणचे विकून 30 ते 40 हजार रुपये सहज कमावता येतील. याशिवाय, जर तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढली तर अशा परिस्थितीत तुम्ही याद्वारे लाखो रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. देशात मोठ्या प्रमाणात लोक लोणच्या बनवण्याच्या व्यवसायातून भरपूर नफा कमावतात. लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे.

Advertisement

Business Idea : गावात सुरू करता येतील ‘हे’ बिजनेस; कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त उत्पन्नाची हमी; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply