Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! तब्बल ‘इतक्या’ रेल्वे स्टेशनवर मिळतेय मोफत वाय-फाय; पहा, कसा होणार फायदा..

मुंबई : स्मार्टफोनबरोबरच देशात इंटरनेटची (Internet) मागणीही वाढत आहे. ऑनलाइन कामकाजामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत नेटवर्कमुळे इंटरनेट काम करत नसेल तर समस्या खूप वाढतात, यापैकी बहुतेक समस्या रेल्वे प्रवासा दरम्यान येतात. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने रेल्वे स्टेशनवर (Railway Station) मोफत वाय-फाय सुविधा (Free Wi Fi Service) देण्यास सुरुवात केली आहे.भारतीय रेल्वे देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधा देत आहे.

Advertisement

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदात्यांपैकी एक असलेल्या RailTel ने म्हटले आहे की, मोफत हाय-स्पीड वाय-फाय इंटरनेट सुविधा आता देशभरातील 6100 रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील उबरनी रेल्वे स्टेशनमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केल्यामुळे, वाय-फाय कव्हरेजसह 6100 रल्वे स्टेशनची संख्या पूर्ण केली आहे. या 6100 रेल्वे स्टेशनपैकी 5000 हून अधिक स्टेशन्स ग्रामीण भागात आहेत. जी ईशान्य विभागातील अनेक स्टेशन्स आणि काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील सर्व 15 स्टेशन्सप्रमाणे देशभरातील अनेक दुर्गम स्टेशनवर वाय-फाय सुविधा प्रदान करतात.

Advertisement

वाय-फाय कनेक्ट करण्यासाठी प्रवाशांनी वाय-फाय पर्याय स्कॅन (Scan) करून ‘रेलवायर’ निवडणे आवश्यक आहे. एकदा का ब्राउजर वापरकर्त्याला Railwire पोर्टलवर घेऊन गेला की, तो एक मोबाइल नंबर विचारेल ज्यावर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. एकदा कनेक्ट झाल्यानंतर, वाय-फाय कनेक्शन 30 मिनिटे टिकेल. हे रेल्वे प्रवाशांना कनेक्ट राहण्यास आणि माहितीसह अद्ययावत राहण्यास मदत करते. वाय-फाय 1 एमबीपीएस (Mbps) वेगाने चालते आणि 30 मिनिटांसाठी ‘विनामूल्य’ आहे.

Loading...
Advertisement

30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हाय स्पीड वाय-फाय सुविधा वापरण्यासाठी युजर्सना नाममात्र शुल्क भरावे लागेल. या प्लानची ​​सुरुवात दररोज 10 रुपयांपासून होते आणि या प्लानमध्ये 34 एमबीपीएस स्पीडसह 5 जीबी इंटरनेट उपलब्ध आहे. प्लान ऑनलाइन खरेदी करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारखे अनेक पेमेंट पर्याय वापरू शकता.

Advertisement

अरे वा.. देशातील ‘इतक्या’ रेल्वे स्टेशनवर मिळतेय मोफत वाय-फाय; रेल्वेमंत्र्यांनी दिलीय माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply