Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : गावात सुरू करता येतील ‘हे’ बिजनेस; कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त उत्पन्नाची हमी; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात अनेकांनी स्वतःचा काहीतरी बिजनेस (Business) सुरू करण्याचा विचार केला, अनेकांनी तर हा विचार प्रत्यक्षात आणून बिजनेस सुरू देखील केला. आजही अनेक जण नवीन बिजनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत. असे बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण अगदी घरुन सुद्धा करू शकतो. तसेच नोकरदार मंडळींना त्यांचा रोजगार सांभाळूनही व्यवसाय करता येणे शक्य होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही गावात राहत असाल आणि व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक बिजनेस आयडीया (Business Idea) देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा बिजनेस सुरू करुन चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

या बिजनेसमध्ये तुम्हाला कमी वेळेत चांगला नफा मिळू शकतो. जर तुम्हाला लहान व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही धान्य आणि तांदूळ विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. या माध्यमातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. त्यासाठी सुरुवातीला काही पैसे गुंतवावे लागतील. गहू, तांदूळ ठेवण्यासाठी गोदामही घ्यावे लागेल जेणेकरून भाव वाढल्यावर ते बाजारात वाजवी दरात विकता येतील. या व्यवसायात तुम्ही कमी गुंतवणुकीत कमी वेळात भरपूर पैसे कमवू शकता.

Loading...
Advertisement

जर तुम्ही तुमच्या गावात व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पीठ, तांदळाची गिरणी सुद्धा सुरू करू शकता, कारण हा असा बिजनेस आहे जो कायमस्वरुपी सुरू राहिल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 50 हजार ते 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुमचा व्यवसाय हळूहळू वाढू लागेल. जर तुम्ही ते छोट्या (Small Business Ideas) प्रमाणावर सुरू केले तर तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. हा बिजनेस अशा ठिकाणी सुरू करा ज्याठिकाणी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारण हा बिजनेस त्या संबंधित आहे. त्याचाही तुम्हाला फायदा होईल.

Advertisement

कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल ‘हा’ बिजनेस; सरकार सुद्धा करील मदत; पहा, किती मिळेल उत्पन्न..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply