Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर अमेरिकेने खरे काय ते सांगितलेच..! रशियाबाबत भारताच्या धोरणाबाबत दिलीय ‘ही’ प्रतिक्रिया..

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी रशिया-युक्रेन युद्धात भारताने स्वीकारलेल्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की अमेरिकेच्या उर्वरित भागीदारांच्या तुलनेत भारताचा प्रतिसाद अस्थिर आहे. क्वाड भागीदार देशांचा संदर्भ देत ते म्हणाले, की रशियावर (Russia) निर्बंध टाकण्यात भारताने (India) नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र, अन्य देशांनी कठोर भूमिका घेत रशियावर निर्बंध टाकले.

Advertisement

राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, भारताचे प्राधान्य आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना बाहेर काढणे आहे. मात्र, प्रत्येक मंचावरून भारताने रशिया-युक्रेन युद्ध सोडवण्यासाठी शांतता चर्चेसाठी वारंवार आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या इतर क्वाड भागीदारांप्रमाणे भारताने रशियावर कोणतेही निर्बंध टाकले नाहीत. तसेच संयुक्त राष्ट्रात (United Nations) रशियाविरुद्धच्या निषेधाच्या प्रस्तावावर मतदान करण्यास नकार दिला.

Advertisement

नंतर NATO चा संदर्भ देत बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधात एक सामायिक आघाडी तयार केल्याबद्दल अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटो, युरोपियन संघ (European Union) आणि आशियातील प्रमुख भागीदारांचे कौतुक केले. रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये रशियाचे चलन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तू अशा अभूतपूर्व निर्बंधांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

बायडेन म्हणाले की, नाटो आज जितका ताकदवान आहे तितका याआधी कधीही नव्हता. नाटो आणि पॅसिफिक परिसरात संयुक्त आघाडी आहे. नाटोचे विभाजन करण्याची योजना पुतिन पूर्ण करू शकले नाहीत. रशियाकडून कमी दराने तेल आयात केल्याबद्दल होत असलेल्या टीकेला भारतीय अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वातील पाश्चिमात्य देश रशियावर निर्बंध टाकत असताना भारत तेल आयात (Crude Oil) करून त्याला मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा खरेदीदार देश आहे. त्याची 85 टक्के तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. यातील रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात तर 1 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे.

Advertisement

युद्धाच्या संकटात कच्च्या तेलाचे काय..? ; सरकारने सांगितलेय रशियाच्या तेलाचे गणित; पहा, आपल्याला किती मिळतेय तेल..

Advertisement

Russia Ukraine War : वा रे अमेरिका..! युक्रेनी लोकांना म्हणतोय युरोपात जा; फक्त ‘इतक्याच’ लोकांना दिलाय आश्रय..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply