Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तब्बल 137 दिवसांनंतर बदलल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती; जाणून घ्या, इंधनाचे भाव वाढले की घटले..

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होऊ लागला आहे. देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झाली आहे. पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 70 पैशांनी वाढले आहे. तब्बल 137 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबर 2021 नंतर किमती प्रथमच बदलल्या आहेत. वाढलेले दर आज सकाळपासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे, आजच घरगुती गॅस टाकीच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे. निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी आम आदमीला हा दुहेरी झटका दिला आहे.

Advertisement

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 87.47 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर 110.82 रुपये आणि 95.00 रुपये प्रति लिटर, कोलकात्यात 105.51 रुपये आणि 90.62 रुपये, चेन्नईमध्ये 102.16 रुपये आणि 92.19 रुपये प्रति लिटर आहेत.

Advertisement

आजपासून म्हणजेच 22 मार्च 2022 पासून दिल्लीत (Delhi) घरगुती LPG टाकीची किंमत 949.5 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होते. कोलकाता (Kolkata) शहरात तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14.2 किलोच्या विनाअनुदानित टाकीची किंमत 926 रुपये होती, ती आजपासून 976 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे लखनऊमध्ये किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपये झाली आहे. पाटण्यात ते 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये (Chennai) 965 रुपये तर मुंबईमध्ये (Mumbai) 949 रुपये इतकी किंमत आहे. याआधी मुंबईमध्ये गॅस टाकी 899.5 रुपये दराने मिळत होती.

Loading...
Advertisement

विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने लोकांना दिलेला हा मोठा धक्का आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) सुद्धा वाढल्या आहेत. पेट्रोलमध्ये 80 पैसे आणि डिझेलच्या दरात 70 पैसे इतकी मोठी वाढ तेल कंपन्यांनी केली आहे.

Advertisement

निवडणुकीनंतर ‘आम आदमी’ ला जोरदार झटका..! घरगुती गॅस टाकीचे दरात मोठी वाढ; पहा, किती रुपये वाढलेत भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply