Airtel चे 5 एकदम स्वस्त डेटा रिचार्ज; फक्त 19 रुपयांत मिळेल 1 GB डेटा; चेक करा, डिटेल..
मुंबई : दिग्गज दूरसंचार कंपनी Airtel देखील सामान्य रिचार्ज प्लॅनसह 4G डेटा व्हाउचर (Deta Voucher) ऑफर करते. रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यास हे 4G डेटा व्हाउचर वापरले जाऊ शकतात. त्यांची किंमत 19 रुपयांपासून 301 रुपयांपर्यंत आहे. तथापि, यात कॉल किंवा एसएमएससारखे फायदे मिळणार नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. येथे आम्ही तुम्हाला Airtel च्या 5 स्वस्त 4G व्हाउचर्सबद्दल माहिती देणार आहोत. एखाद्या वेळी तुमचा इंटरनेट डेटा संपला तर दुसरे जास्त किंमतीचे रिचार्ज करण्याऐवजी हे कमी किंमतीतील डेटा व्हाउचर तुमची मदत करतील.
19 रुपयांचे 4G व्हाउचर एअरटेलचे हे सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर आहे. तुम्हाला 19 रुपयांमध्ये 1 GB डेटा दिला जातो. या व्हाउचरची वैधता (Validity) देखील फक्त 1 दिवस आहे. जर तुम्हाला फक्त एका दिवसासाठी इंटरनेटची गरज असेल तर हे व्हाउचर एक चांगला पर्याय असेल. 58 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला 3 GB डेटा दिला जातो. तथापि, या पॅकची वैधता तुमच्या चालू योजनेप्रमाणे असते. 5 GB डेटा तुम्हाला 98 रुपयांमध्ये दिला जातो.
या व्हाउचरची वैधता तुमच्या चालू रिचार्ज योजनेच्या वैधतेनुसार असेल. विशेष म्हणजे, यामध्ये विंक म्युझिक (Wynk Music) प्रीमियम सदस्यत्वही मोफत मिळते. 108 रुपयांच्या या व्हाउचरमध्ये तुम्हाला 6 GB डेटा मिळतो. पॅकची वैधता तुमच्या चालू रिचार्ज योजनेच्या वैधतेनुसार असेल. याबरोबर विंक म्युझिक, फ्री हॅलोट्यून्स (Free Hellotunes) आणि प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन सबस्क्रिप्शन (Subscription) 30 दिवसांसाठी दिले जाते. 118 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर आहे. हे 12 GB डेटासह येते आणि वैधता तुमच्या चालू प्लानच्या वैधतेनुसार असेल.
Jio च्या ‘या’ प्लानने Vodafone-Airtel ला दिलाय झटका.. पहा, काय मिळतात जबरदस्त फायदे..