Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकीनंतर ‘आम आदमी’ ला जोरदार झटका..! घरगुती गॅस टाकीचे दरात मोठी वाढ; पहा, किती रुपये वाढलेत भाव..

मुंबई : घरगुती गॅस टाकीच्या दरवाढीने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल नाही पण, गॅस टाकीच्या (LPG Cylinder) दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरखर्चाचे बजेट आणखी बिघडणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर आजपासून 50 रुपयांनी वाढले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळत होता. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी टाकीचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.

Advertisement

आजपासून म्हणजेच 22 मार्च 2022 पासून दिल्लीत (Delhi) घरगुती LPG टाकीची किंमत 949.5 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होते. कोलकाता (Kolkata) शहरात तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14.2 किलोच्या विनाअनुदानित टाकीची किंमत 926 रुपये होती, ती आजपासून 976 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे लखनऊमध्ये किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपये झाली आहे. पाटण्यात ते 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये (Chennai) 965 रुपये तर मुंबईमध्ये (Mumbai) 949 रुपये इतकी किंमत आहे. याआधी मुंबईमध्ये गॅस टाकी 899.5 रुपये दराने मिळत होती.

Loading...
Advertisement

6 ऑक्टोबर 2021 नंतर, घरगुती LPG टाकीचे 21 मार्च 2022 पर्यंत स्थिर होते. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीने प्रति बॅरल 140 डॉलरचा टप्पा पार केला होता. मात्र, या काळात व्यावसायिक (Commercial) गॅस टाकीच्या किमतीत लक्षणीय बदल झाला. ऑक्टोबर 2021 ते 1 मार्च 2022 दरम्यान व्यावसायिक गॅस टाकीच्या किंमतीत 275 रुपयांनी वाढ झाली आहे, तर 1 मार्च 2021 ते 2022 दरम्यान घरगुती एलपीजी टाकीची किंमत केवळ 81 रुपयांनी वाढली आहे. आता घरगुती गॅस टाकीचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने लोकांना दिलेला हा मोठा धक्का आहे. यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) किती वाढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आता फक्त 2 तासांत घरीच मिळणार गॅस टाकी..! ‘या’ शहरात कंपनीने सुरू केलीय कार्यवाही; पहा, आपल्याकडे कधी होणार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply