पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने यंदा आंबा निर्यातीसाठी अत्यावश्यक असणारी निर्यात प्रक्रिया यासाठी जोरात तयारी केली आहे. बारामती (पुणे), नाचणे (रत्नागिरी), जामसंडे (सिंधुदुर्ग) तसेच जालना, लातूर, बीड, वाशी अशा ९ ठिकाणाहून निर्यातीसाठी आंब्यावर प्रामुख्याने विकिरण, व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट या प्रक्रिया केल्या जाणार आहेत. मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Mango Export from Maharashtra state, MSAMB gives information)
कृषी पणन मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या आंबा निर्यात पॅकहाऊस, तसेच विकिरण सुविधांचे एनपीपीओ, अपेडा तसेच अमेरिकेकडून प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू असून हे प्रमाणीकरण आंबा हंगामापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. आंब्याची दरवर्षी सुमारे ५० हजार टन इतकी निर्यात होते, मात्र यंदा सुमारे अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हापूस, केशर यासह कर्नाटकातून बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशातून दशहरी, चौसा या आंब्याची निर्यात केली जाते. अपेडामार्फत हापूसच्या निर्यातीला अधिकाधिक चालना देण्याचा पणन मंडळाचा प्रयत्न असून राज्यात निर्यात सुविधांची उपलब्धता असल्याने निर्यातक्षम उत्पादन, निर्यातपूर्व प्रक्रिया, दर्जा याबाबतीत राज्यातील आंबा उच्च स्तरावर आहे.
- मोदी सरकारच्या कराराचा शेतकऱ्यांना होणार फायदा; तब्बल 85 कोटी डॉलरने…
- बच्चे कंपनीच्या आवडत्या ‘मॅगी’बाबत मोठा निर्णय.. खाण्याचे वांदे होणार…!