Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किफायतशीर शेळीपालनासाठी ‘त्या’ गोष्टी महत्वाच्या; पहा नेमके काय म्हटलेय डॉ. रसाळ यांनी

अहमदनगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, पदव्युत्तर महाविद्यालय यांच्यामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत एक दिवसीय किफायतशीर शेळीपालन तंत्र हा प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. त्यात मार्गदर्शन करताना डाॅ. प्रमोद रसाळ यांनी सांगितले की, शेळी पालन व्यावसायासाठी शेळ्यांची निवड आहार व व्यवस्थापन महत्त्वाचे असून शेळ्यांची व करडांची विक्री वजनावर केल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांना किफायतशीर ठरेल.

Loading...
Advertisement

प्रशिक्षण समन्वयक व अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप देवकर, डॉ. बाळासाहेब पाटील, सहायक प्राध्यापक डॉ. योगेश कांदळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले यांनी किफायतशीर शेळीपालन तंत्र या विषयावर, पशुवैद्यक शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विष्णू नरवडे यांनी शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन व मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश कांदळकर यांनी शेळ्यांचे आहार व्यवस्थापन माहिती दिली. (MPKV Rahuri Goat Farming Project and Training; Dr. Pramod Rasal gives information)

Advertisement
Advertisement

Leave a Reply