मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत एक मोठी बातमी आहे. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) सोमवारी सांगितले, की कंपनीने इस्रायल-आधारित तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये (Storedot) गुंतवणूक केली आहे. जी एक्स्ट्रीम फास्ट चार्जिंग (XFC) सोल्यूशन्ससह बॅटरीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे.
Ola Electric ने एका निवेदनात म्हटले आहे की, Storedot मधील गुंतवणूक ही कंपनीने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे. StoreDot मधील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून, Ola Electric कंपनीला बॅटरी तंत्रज्ञानामध्ये प्रवेश मिळेल, जे केवळ 5 मिनिटांत 0 ते 100 टक्के बॅटरी चार्ज करेल. कंपनीने सांगितले की, ओलाकडे देशात स्टोअरडॉटच्या जलद चार्जिंग तंत्रज्ञानाला एकत्रित करणार्या बॅटरीच्या निर्मितीचे विशेष अधिकार असतील. मात्र, कंपनीने आर्थिक तपशीलाबाबत माहिती दिलेली नाही.
ओलाने आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात उत्पादनासाठी गिगाफॅक्टरी उभारण्याची योजना आखली आहे. सरकारच्या PLI योजनेंतर्गत प्रगत रासायनिक सेल बॅटरी स्टोरेजसाठी त्यांनी आधीच बोली सादर केली आहे. Ola चे CEO भाविश अग्रवाल म्हणाले, की “आम्ही या क्षेत्रात अत्याधुनिक काम करणाऱ्या जागतिक कंपन्यांबरोबर भागीदारी करत आहोत. इलेक्ट्रिक वाहनांचे भविष्य अधिक चांगल्या, वेगवान आणि दर्जेदार ऊर्जा घनतेच्या बॅटरीमध्ये आहे. आम्ही बॅटरी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीत वाढ करत आहोत.
दरम्यान, Ola S1 Pro ची किंमत वाढणार आहे. जेव्हा पुढील खरेदी सुरू होईल तेव्हा कंपनी ते जास्त किंमतीला विकेल. सध्या Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये आहे. 18 मार्चनंतर कंपनीने किंमतीत वाढ करण्याची माहिती दिली आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. ग्राहक स्कूटर ओला अॅपद्वारेच खरेदी करू शकतात.
कंपनीने Ola S1 Pro स्कूटरमध्ये 8.5kW ची बॅटरी दिली आहे. यामध्ये तीन राइडिंग मोड मिळतात नॉर्मल, स्पोर्ट्स, आणि हायपर. इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी/तास आहे. ते केवळ 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने पोहोचते. कंपनीचा दावा आहे, की ही स्कूटर पूर्ण चार्जमध्ये 181 किमी पर्यंत रेंज देऊ शकते. S1 Pro मध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिमोट स्टार्ट/स्टॉप आणि लॉक/अनलॉक सारखी प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतात. दोन्ही चाकांमध्ये पुढील आणि मागील डिस्क ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम प्रदान करण्यात आली आहे.
बापरे.. किती ही महागाई..! आता स्कूटर खरेदीही देणार टेन्शन; ‘या’ कंपनीने केलीय दरवाढीची घोषणा..
वाव.. एका वेळी चार्ज होणार तब्बल 1000 इलेक्ट्रिक कार.. ‘या’ शहरात आहे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन